कांदा अपडेट : मोदींच्या आत्मनिर्भर भारतात शेतकरी नाही का; किसानपुत्राचा संतप्त सवाल

पंधरा दिवस चांगले भाव मिळाले नाहीत तोवर लगेचच कुठेही मागणी नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने कांद्याच्या निर्यातीला ब्रेक लावला आहे. निर्यातबंदीचा हा निर्णय कालपासून तातातीने लागू झाल्याने आता बाजारात शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव आपटणार आहेत. याबाबत देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. भोरवाडी (ता. नगर, जि. अहमदनगर) येथील किसानपुत्र व शेतीचे अभ्यासक असलेले पीएचडी फेलो प्रा. संदीप वाघ यांनी याबाबत तीव्र शब्दात निषेधाची पोस्ट फेसबुकवर लिहिली आहे.

https://www.facebook.com/photo/?fbid=3513963055385957&set=a.314837161965245

त्यांनी म्हटले आहे की, महामहिम मोदी सरकार तुमच्या आत्मनिर्भर भारतात “शेतकरी” येत नाही काय? आज केंद्र शासनाने कांद्याचे दर ३० रुपये प्रतिकिलोच्या पुढे गेलेत हे कारण देऊन सर्व प्रकारच्या कांद्यांची निर्यात बंद केली, याचा सर्वप्रथम मी किसानपुत्र म्हणून निषेध करतो. सुरवातीला फुकट देऊन नंतर व्यसन लावून २०० रुपये महिन्याचे घेणाऱ्या अंबानीला तुम्ही TRAI ची बंधने लागू करणार नाहीत, गेल्या काही वर्षांत खते, बी-बियाणे, पशुआहार आणि इतर औद्योगिक क्षेत्रातील वस्तू यांच्या वाढलेल्या भरमसाठ किमती यांवर काहीही उपाययोजना न करणारे तुमचे सरकार शेतकऱ्यांना कुठे हक्काचे, घामाचे चार पैसे मिळायची चिन्हे दिसु लागली की लगेच त्यांच्या मुळावर उठायला तयार. एकीकडे शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करायच्या गप्पा मारायच्या आणि त्यातुन होणाऱ्या उत्पन्नावर आपण असा घाला घालणार असाल तर ती फक्त करमणूक की बात म्हणावी लागेल.

त्यांनी पुढे म्हटले आहे की, अहो मायबाप सरकार. मंदिर-मस्जिद, जात, धर्म, युद्धाचा ज्वर आणि माध्यमे विकत घेऊन लोकांना भावनिक करून पाजलेला देशभक्तीचा डोस यातून काही काळ ग्लानी नक्की येईल, पण भाकरीच काय? त्याला तर शेतीच लागेल ना? ती पिकवणारा जर समृद्ध झाला तर बिघडतंय कुठे? आणि जर तस नसेल तर मग त्याच्यावरच हा अन्याय का करताय? आजही वैश्विक संकटात तुमची लंगोट बनून लाज फक्त याच कृषीक्षेत्राने राखलीये हे विसरू नका, भानावर या. आम्ही असंघटित जरी नसलो तरी कमी समजू नका. तुमच्या या शेतकरीविरोधी मानसिकतेची प्रचंड चीड येतीये, पण तूर्तास एवढेच.

संपादन : सचिन मोहन चोभे

ट्रॅक्टरचलीत उत्तम औजारे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे आमचे विश्वराजचे दुकान..👍

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, September 6, 2020

शेती-मातीची माहिती आणि इतर अपडेटसाठी पुढील ठिकाणी आम्हाला लाईक, फॉलो व सबस्क्राईब करा

फेसबुक पेज (वाचणे) : कृषीरंग Krushirang

युट्युब चॅनेल (पाहणे) : KrushiRang Live

Khabri चॅनेल (ऐकणे) : Krushirang Marathi | कृषीरंग

ता.क. : कृषीरंगवर तुमची संस्था, फर्म, कंपनी, उत्पादने किंवा कार्यक्रमाची बातमी आणि जाहिरातीही आम्ही प्रसिद्ध करतो. त्याबाबतच्या ब्रँडिंग व प्रमोशनसाठीच्या माहितीसाठी आम्हाला ९४२२२१५६५८ यावर मेसेज (व्हाटस्अॅप / टेक्स्ट) किंवा krushirang@gmail.com या इमेलद्वारे संपर्क करा.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here