गुड न्यूज : महिलांना मिळणार व्याजमुक्त कर्ज; पहा कोण आणि कुठे घेऊ शकतो लाभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दि. १७ सप्टेंबर २०२० पासून रूपानी सरकारने एक नवी आणि महत्वाची योजना आणण्याचे जाहीर केले आहे. मुख्यमंत्री महिला कल्याण योजना (एमएमकेएस) असे या योजनेचे नाव असून त्याद्वारे महिला बचत गटांना १ लाख रुपये कर्ज व्याजमुक्त स्वरुपात मिळणार आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी या महत्वपूर्ण योजनेची घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, सध्या करोना लॉकडाऊन आणि एकूण आर्थिक घडामोडीमुळे महिलांना रोजगार मिळवून देणे ही सरकारची प्राथमिकता आहे. त्यानुसार मोदिजींच्या वाढदिवसानिमित्त सरकार ही नवी योजना राज्यभरात लागू करणार आहे. यामध्ये १० महिलांच्या एका गटाला १ लाख रुपये इतके बँक कर्ज मिळेल. त्याचे संपूर्ण व्याज राज्य सरकार भरणार आहे. महिलांना या योजनेचा लाभ मिळेल.

गुजरातच्या ग्रामीण भागातील ५० हजार आणि शहरी भागातील ५० हजार अशा १ लाख महिला बचत गटांना या योजनेचा लाभ मिळेल. ‘गुजरात लाइवलीहुड प्रमोशन कंपनी’ ही सरकारी संस्था यासाठीची अंमलबजावणी करणार आहे. राष्ट्रीयकृत बँक, सहकारी बँक आणि रिझर्व बँक ऑफ इंडिया यांच्याकडील शेड्युल्ड वित्तसंस्था यांच्याकडून या कर्जाचे वितरण केले जाणार आहे. गुजरात सरकारने जाहीर केलेल्या या योजनेनंतर इतर राज्यांमध्येही अशाच पद्धतीच्या योजनेबाबत विचार होण्याची शक्यता आहे.

संपादन : माधुरी सचिन चोभे

होय, आम्ही देतो घरपोहोच किराणा सेवाअहमदनगर शहरातील ग्राहकांच्या आग्रहास्तव लोकरंग मेगामार्ट यांची अहमदनगर शहरामध्ये…

Posted by लोकरंग L MegaMart on Thursday, March 26, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here