‘ही’ कंपनी करणार १ लाख नोकरभरती; पहा कशासाठी आणि कुठे मिळणार नोकरी

जगातील एक बलाढ्य कंपनी बनलेल्या अॅमॅझॉन (Amazon) कंपनीने जगभरात आपल्या विस्ताराचे मनसुबे अगोदरच जाहीर केलेले आहेत. भारतात अगोदर असलेल्या आठ सोर्ट केंद्रांमध्ये आधुनिकीकरण आणि नव्या नोकर भारतीसह आणखी ५ सोर्ट सेंटरमध्येही या नोकरीच्या संधी दिल्या जाणार आहेत.

अशा पद्धतीने जगभरात आणखी किमान १ लाख नोकऱ्या देण्याची तयारी या कंपनीने ठेवली आहे. एकूणच आपले नेटवर्क आणखी प्रभावी करण्यासाठी ही कंपनी आता वेगाने पावले उचलणार असल्याचे दिसते. पार्सल पॅकिंग, डिलिव्हरी आणि इतर कामासाठी स्थायी आणि अस्थाई अशा दोन्ही पद्धतीने ही भरती केली जाणार आहे. मात्र, सुटीच्या दिवसासारखी खूप कमी दिवसासाठी ही नोकरभरती केली जाणार नसल्याचे त्यांनी म्हटलेले आहे.

सध्या या कंपनीकडून खरेदी करणाऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेष म्हणजे किराणा (ग्रोसरी) सेक्टरमध्ये अनेक नवे ग्राहक जोडले जात आहेत. त्यामुळे कंपनीने आपल्या विस्तार आणि ग्राहकांच्या सेवेसाठी चालू वर्षी १ लाख ७५ हजार इतके नवे कर्मचारी घेण्याचे नियोजन केले आहे. त्यातील ३३ हजार नव्या नोकऱ्या आतापर्यंत देण्यात आलेल्या आहेत. उरलेल्या १ लाख पुढील १-२ महिन्यात भरल्या जाण्याची शक्यता आहे.

संपादन : सचिन पाटील

होय, आम्ही देतो घरपोहोच किराणा सेवाअहमदनगर शहरातील ग्राहकांच्या आग्रहास्तव लोकरंग मेगामार्ट यांची अहमदनगर शहरामध्ये…

Posted by लोकरंग L MegaMart on Thursday, March 26, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here