होय, ‘स्टार वॉर’चीच तयारी म्हणा की; भारताचे DRDO बनवणार आहे ‘अशी’ शस्त्रास्त्रे..!

सध्या भारत-चीन यांच्यातील सीमावाद आणि एकूण जगभरातील वाढत असलेली तणावपूर्ण शांतता लक्षात घेऊन आता भारतीय संशोधकांनी अत्याधुनिक आणि स्वप्नवत वाटणारी शस्त्रास्त्रे तयार करण्याची तयारी केली आहे. डिफेंस रिसर्च ऐंड डेवलपमेंट ऑर्गनाइजेशन (DRDO) यांनी स्टार वॉर सिनेमात दिसणारी आणि कल्पनेत असलेली डायरेक्‍टेड एनर्जी वेपंस (DEWs) शस्त्रे बनवण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे.

नवभारत टाईम्स वृत्तापत्राचे पत्रकार रजत पंडित यांनी ही बातमी प्रसिद्ध केली आहे. त्यात त्यांनी अशा पद्धतीने अस्त्रे व शस्त्रे विकसित करणारा प्रकल्प डीआरडीओ यांनी हाती घेतल्याची माहिती दिली आहे. यावर सध्या संशोधक तयारी करीत आहेत. एकही शस्त्र आणि अस्त्र अंतिम टप्प्यात आलेले नाही. मात्र, याचे संशोधन योग्य पद्धतीने चालू असल्याचे त्यात म्हटले आहे.

अशा पद्धतीची अस्त्रे ही काळाची गरज आहे. कारण, याद्वारे आपले सैनिक न पाठवता फ़क़्त लांबून रिमोटवर ही शस्त्रे चालवून शत्रू राष्ट्राला जेरीस आणणे शक्य होणार आहे. भारताच्या शेजारी असलेल्या चीन, पाकिस्तान आणि नेपाळ या कुरापतखोर देशांना वठणीवर आणायला याचीच आवश्यकता आहे. जगभरात फ़क़्त कल्पनेत असलेली अशीच शस्त्रे बनवण्याचा हा प्रकल्प आहे.

भारतीय सैन्याला हाई पावर इलेक्‍ट्रोमैग्‍नेटिक वेपन सिस्‍टम यांची आवश्यकता आहे. त्यासाठी दोन टप्प्यात संशोधन करून ते विकसित केले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात ६.८ किलोमीटरवरील लक्ष्यभेद करणारी, आणि मग दुसऱ्या टप्प्यात २० किलोमीटर यापेक्षाही जास्त अंतरावरील लक्ष्यभेद करणारी अशा अस्त्रांच्या विकसन आणि निर्मितीसाठीचा हा प्रकल्प आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

स्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, August 9, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here