कांद्याचा वांदा : मोदी सरकारचा निर्णय बेकायदेशीर; निर्यातबंदीवर शेतकरी संघटना आक्रमक..!

चांगला भाव मिळण्याचे पंधरा दिवस होत नाहीत तोच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने कांदा निर्यातीला खोडा घातला आहे. त्यामुळे कांद्याचे भाव खूप मोठ्या प्रमाणात कोसळण्याची शक्यता आहे. त्याबाबत तीव्र संताप व्यक्त करीत शेतकरी संघटनेने हा निर्णय बेकायदेशीर असल्याचे म्हणत आंदोलनाची हाक दिली आहे.

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी याबाबत म्हटले आहे की, कांदा आवश्यक वस्तूच्या कायद्यातुन काढलेला असताना केंद्र शासनाने कांद्यावर निर्यातबंदी घातली आहे. हे बेकायदेशीर आहे. याचा निषेध करण्यासाठी व केंद्र शासनाला हा निर्णय मागे घेण्यास भाग पाडण्यासाठी उद्या सकाळ पासुन जिथे जमेल तेथे, बेमुदत रस्ता रोको आंदोलन सुरु करा. बातमी येताच २७/- रुपये किलोने ठोक विकणारा कांदा ७/- रुपयावर आला आहे. सरकारला धडा शिकविण्यासाठी उद्य‍ाच (दि.१५ सप्टेंबर पासुन) आंदोलनाला सुरुवात करा.

एकूणच कांदा निर्यातीला खोडा घालून मोदी सरकारने बिहारच्या निवडणुकीत होणारे संभाव्य नुकसान टाळण्याची तयारी केली असल्याचे बोलले जात आहे. त्याबाबत आता महाराष्ट्र, कर्नाटक आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पट्ट्यात कोणती भूमिका घेतली जाणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

ट्रॅक्टरचलीत उत्तम औजारे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे आमचे विश्वराजचे दुकान..👍

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, September 6, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here