कांदा अपडेट : मोदी सरकारने घातला निर्यातीला खोडा; शेतकरी संघटनेची आंदोलनाची हाक

मागील चार दिवसांपासून बाहेरील कांदा भारतात आयात करणार असल्याच्या बातम्या येत असतानाच कांद्याचे भाव सरासरी ५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत घसरले होते. त्यात आता केंद्र सरकारने निर्यात बंदीची घाई दाखवून शेतकरीविरोधी निर्णय घेऊन टाकला आहे. त्यामुळे आता बाजारात कांद्याचे भाव आणखी मोठ्या प्रमाणात पडण्याची चिन्हे आहेत. अशावेळी शेतकऱ्यांनी तातडीने रस्त्यांवर उतरून आंदोलन करण्याची हाक शेतकरी संघटनेने दिली आहे.

डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड यांनी सोमवारी तातडीने दखलपात्र आणि देशभरात लागू होणारा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता भारतातील कांदा, कांदा पावडर आणि कांद्याचे प्रक्रिया केलेले पदार्थही निर्यात करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने ही मेख मारून ठेवली आहे.

याबाबत संताप व्यक्त करताना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी फेसबुकवर म्हटले आहे की, आत्ताच कांद्यावर निर्यातबंदी लादुन कांद्याचा वांदा करण्याचं षडयंत्र जाहीर… शेतकऱ्यांनो जागे व्हा!! त्यांनी पुढे म्हटले आहे की, कांदा आवश्यक वस्तूच्या कायद्यातुन काढलेला असताना केंद्र शासनाने कांद्यावर निर्यातबंदी घातली आहे. हे बेकायदेशीर आहे. याचा निषेध करण्यासाठी व केंद्र शासनाला हा निर्णय मागे घेण्यास भाग पाडण्यासाठी उद्या सकाळ पासुन जिथे जमेल तेथे, बेमुदत रस्ता रोको आंदोलन सुरु करा. बातमी येताच २७/- रुपये किलोने ठोक विकणारा कांदा ७/- रुपयावर आला आहे. सरकारला धडा शिकविण्यासाठी उद्य‍ाच (दि.१५ सप्टेंबर पासुन) आंदोलनाला सुरुवात करा.

संपादन : सचिन मोहन चोभे

https://www.facebook.com/photo/?fbid=3603339779716876&set=a.239546286096259

ट्रॅक्टरचलीत उत्तम औजारे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे आमचे विश्वराजचे दुकान..👍

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, September 6, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here