संसद अधिवेशन पहिला दिवस : ‘त्या’ मुद्द्यावरून सुप्रिया सुळे आक्रमक, राहुल गांधीनी गमावली ‘ती’ संधी

दिल्ली :

देशात करोनाने हाहाकार माजवला आहे. ५ संसद सदस्य आधीच करोनाबाधित आहेत. अशा परिस्थितीतही संसदेचं अधिवेशन आजपासून (सोमवार) सुरु झालेलं आहे. संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सुरुवातीच्या सत्रातच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर हल्लाबोल करत देशातील आर्थिक परिस्थितीवर भाष्य केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर नाराजीही व्यक्त केली.

त्या म्हणाल्या की, लॉकडाऊनमुळे सगळा देश अडीच तीन महिने बंद होता. त्यामुळे लाखो लोकांचा रोजगार गेला. कोरोनामुळे आपल्यासह जगभरातील बहुतांश देशांना मोठा फटका बसला. यामुळे झालेली हानी भरुन काढण्यासाठी केंद्र सरकारने उपाययोजना हाती घेण्याची नितांत आवश्यकता आहे. परंतु असं होताना दिसत नाही.

यावेळी त्यांनी रोजगाराचा मुद्द्याला प्राधान्य देत म्हटले की, देश सध्या आर्थिक संकटात आहे. तरूणांना रोजगार नाही त्यामुळे तातडीने उपाय योजना करण्याची गरज आहे. मात्र तसं होतांना दिसत नाही.

कॉंग्रेस नेते व खासदार राहुल गांधी हे ट्वीटरवर सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल करत असतात. मात्र आज पहिल्याच दिवशी ते अधिवेशनाला गैरहजर होते. बिहार निवडणुका जवळ येऊन ठेपल्या असताना राहुल गांधी मात्र परदेशात आहेत. केंद्र सरकारला प्रश्न विचारून घेरण्याची मोठी संधी राहुल गांधीनी वाया घातली आहे. त्यावरून काँग्रेसचे काही नेते त्यांच्यावर नाराज असल्याचे समजत आहे.

संपादन : विनोद्कुमार सूर्यवंशी      

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here