भारत आणि चैन यांच्यातील सीमावाद गंभीर वळणावर असून त्यातून मार्ग निघण्याची अजूनही ठोस अपेक्षा निर्माण झालेली नाही. त्यातच आता चीनने भारताला अडचणीत आणण्यासाठी विशेष पद्धतीचे तंत्रज्ञान आणि खेळी केल्याचेही समोर येत आहे. हाइब्रिड वॉरफेयर असे नाव असलेल्या या तंत्राच्या वापरणे चीन भारताला संकटात आणण्याची तयारी करीत असल्याचे इंडियन एक्स्प्रेस यांनी आपल्या बातमीत म्हटले आहे.
त्यांनी ब्रेकिंग न्यूज प्रसिद्ध करताना म्हटले आहे की, रशियाने ज्या पद्धतीने वेगळी खेळी करून क्रीमिया ताब्यात घेतला होता त्याच पद्धतीचा हा लष्करी खराखुरा खेळ आहे. रशियाने असे यश मिळवल्यावर अनेक देशांनी अशी हाइब्रिड वॉरफेयर पद्धत विकसित करण्याचे डोके लावले होते. मात्र, चीनने त्यात खूप पुढे मजल मारली आहे. १९९९ पासून चीनची पीपुल्स लिबरेशन आर्मी त्यासाठी काम करीत आहे. कर्नल कीआओ लिआंग आणि कर्नल वांग शिआंगसूई यांनी त्याचा पाया रचला आहे. तर, झेन्हुआ ही चीनी कंपनी त्यासाठी भारतावर लक्ष ठेऊन आहे.
बातमीत म्हटले आहे की, राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्री, विरोधातील नेते, प्रमुख अधिकारी, संशोधक अशा किमान १० हजार लोकांवर ही कंपनी लक्ष ठेऊन आहे. अशावेळी चीनच्या मोबाइल अॅप्लिकेशनवर बंदी घालूनही या कंपनीला काहीही फरक पडणार नाही. सोशल मिडिया आणि इतर तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे ही कंपनी अशी धक्कादायक चाल खेळत आहे. यामध्ये भारतामध्ये दोन्ही राजकीय व सामाजिक गटांमध्ये भांडण वाढवण्याचाही प्लॅन केला जात आहे. एकूणच या कंपनीची पाळेमुळे अनेक देशात खोलवर पोहोचली असू शकतात.
भारतातील महत्वाच्या व्यक्तींवर रेकी करण्याचाच हा प्रकार आहे. फ़क़्त यासाठी डिजिटल आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतींचा वापर केला जात आहे. एकूणच असे स्पष्ट होत आहे की, भारत आणि इतर लोकशाहीवादी देशातील सत्ता, व्यवस्था आणि सामाजिक एकोपा मोडीत काढून त्या देशाला आपल्या काह्यात ठेवणे आणि प्रसंगी त्यावर कब्जा करणे असेच या झेन्हुआ कंपनीच्या ‘हाइब्रिड वॉरफेयर’ची चाल आहे.
संपादन : सचिन पाटील
- फायद्याची माहिती : म्हणून महाराष्ट्रालाही गरज आहे भावांतर योजनेची; वाचा योजनेचे वैशिष्ट्ये
- भाजीपाला मार्केट अपडेट : एकाच क्लिकवर पहा पालक, शेपू, कोथिंबीर, मेथीसह पातीचे बाजारभाव
- टोमॅटो मार्केट अपडेट : पहा, आजचे ताजे भाव
- कांदा मार्केट अपडेट : पहा, आजचे लाल व उन्हाळचे भाव
- पुणे, वडूज, सांगलीत ज्वारीने खाल्लाय भाव; वाचा महाराष्ट्रात कुठे व किती आहे भाव