ब्रेकिंग : म्हणून करोना रुग्णांमध्ये थॉम्बोसिस आणि सीवियर थोंबोसाइटोपीनियाचीही लक्षणे; वाचा महत्वाची बातमी

करोना विषाणूमुळे अनेक रुग्णांना वेगवेगळे लक्षण पाहायला मिळत आहेत. काहींना काहीच लक्षणे दिसत नसताना अनेकांना सर्दी, खोकला, ताप, चव न लागणे, अंगदुखी अशी साधारण लक्षणे दिसत आहेत. मात्र, आता हाच करोना विषाणू रुग्णांच्या थेट बोनमॅरोवर हल्ला करीत असल्याचेही स्पष्ट झालेले आहे. लखनौ येथील पिजीआय (Sanjay Gandhi Postgraduate Institute of Medical Sciences) मध्ये अशा पद्धतीची लक्षणे दिसल्याची माहिती डॉ. अनुपम वर्मा यांनी दिली आहे.

त्यांनी नवभारत टाईम्स या वृत्तपत्राला दिलेल्या माहितीमध्ये म्हंटले आहे की, काहींना झपाट्याने प्लेटलेट्स कमी होण्याची समस्याही दिसली आहे. २० हजारापेक्षा कमी प्लेटलेट्स होण्याची लक्षणे गंभीर जरी रुग्णांमध्ये दिसली आहेत. त्याची टक्केवारी कमी आहे. मात्र, असे रुग्ण सापडले आहेत. त्याचवेळी थेट बोनमॅरोवर हल्ला करून रुग्णांना त्रास देणारे लक्षणही काही रुग्णांमध्ये दिसत आहेत.

शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील मार्केट, पॉलिटिकल & इकॉनॉमिक अपडेट्ससाठी पेज लाईक करून 'सी फर्स्ट' म्हणा..

Posted by कृषीरंग on Monday, September 7, 2020

त्यांनी म्हटले आहे की, प्लेटलेट्स कमी झाल्यावर त्या पुन्हा देणे किंवा प्लाझ्मा थेरपी हा उपाय आहेच म्हणा. मात्र, त्याचवेळी अनेकांच्या रक्तात गुठळी बनण्याची लक्षणे दिसत आहे. त्याला थॉम्बोसिस असे म्हणतात. अशावेळी रक्तातील या क्लॉटिंग झालेल्या गुठळ्यासाठी टीपीए इंजेक्शन दिले जाते. त्याने त्या गुठळ्या विरघळण्याची प्रक्रिया सुरु होते. मात्र, त्याचवेळी अनेकदा आतील नस यामुळे रक्ताच्या जास्त दाबाने फुटण्याचीही शक्यता असते. काही रुग्णांमध्ये असे लक्षण दिसले आहे. याला सीवियर थोंबोसाइटोपीनिया म्हणतात आणि करोना विषाणूने बोनमॅरोवर हल्ला केल्याने असे लक्षण दिसत आहे.

एकूणच करोना म्हणजे कसा आला आणि कसा पसरला यासह शरीरावर नेमके कोणते लक्षण दाखवतो याचीही नवनवीन माहिती समोर येत आहे. अशावेळी रोगप्रतिकार शक्ती वाढवणे आणि मानसिकता सकारात्मक ठेऊन याच्याशी लढणे हेच महत्वाचे असल्याचे पुन्हा-पुन्हा स्पष्ट होत आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

ता.क. : करोना विषाणूबाबत माहितीसाठी आरोग्य मंत्रालयाच्या +91-11-23978046 किंवा ncov2019@gmail.com & ncov2019@gov.in या विशेष हेल्पलाईनवर संपर्क साधावा.

स्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, August 9, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here