धक्कादायक : करोनाचे ‘हे’ही लक्षण येतेय पुढे; एकाच झटक्यात डेंग्यूलाही मागे टाकतोय कोविड १९

करोना विषाणू कशा पद्धतीने आपल्या शरीरातील इम्युनिटी पॉवर ध्वस्त करतो आणि त्यामुळे नेमेके काय परिणाम दिसतात याचाच गोंधळ मिटेनासा झाला आहे. करा, यामुळे ही लक्षणे दिसतात आणि न्यूमोनिया होतो असे म्हटले जात असतानाच आता तर रक्तातील प्लेटलेट्स झपाट्याने कमी होण्याचे एक लक्षण यात जोडले गेले आहे.

लखनौ येथील पिजीआय (Sanjay Gandhi Postgraduate Institute of Medical Sciences) रुग्णालयात शहरातील बंधुलोक रुग्णालयातील डॉक्टर करोनामुळे अॅडमिट करण्यात आलेले होते. त्यांना दिसलेल्या लक्षणांमुळे अनेकांना धक्का बसला आहे. याबाबत स्थानिक डॉक्टर अनुपम वर्मा यांनी नवभारत टाईम्स यांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, कोविड १९ च्या अत्यवस्थ रुग्णांच्या प्लेटलेट्स झपाट्याने कमी होण्याचे एक लक्षण दिसत आहे. यामध्ये बोन मॅरोवर परिणाम दिसत आहेत.

ज्या पद्धतीने डेंग्यू आजारामध्ये प्लेटलेट्स झपाट्याने कमी होण्याचे एक लक्षण दिसते. तसाच हा प्रकार आहे. यामध्ये एकाच दिवसात २० हजार यापेक्षा प्लेटलेट्स झपाट्याने कमी होत असल्याचे दिसते. इतर काहींनाही अशीच लक्षणे दिसली असल्याचे म्हटले जात आहे. एकूणच करोनाचा विषाणू वेगेवेगळ्या पद्धतीने शरीरातील इम्युनिटी पॉवरवर हल्ला करीत असल्याचेच यानिमित्ताने दिसत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. त्यासाठी नागरिक व रुग्णांनीही मानसिकदृष्ट्या सक्षम राहण्याची आणि इम्युनिटी सिस्टीम चांगली राहण्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. खूप कमी रुग्णांना अशी लक्षणे दिसली आहेत. त्यामुळे घाबरून न जाण्याचेही डॉक्टरांनी म्हटले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

ता.क. : करोना विषाणूबाबत माहितीसाठी आरोग्य मंत्रालयाच्या +91-11-23978046 किंवा ncov2019@gmail.com &ncov2019@gov.in या विशेष हेल्पलाईनवर संपर्क साधावा.

ट्रॅक्टरचलीत उत्तम औजारे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे आमचे विश्वराजचे दुकान..👍

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, September 6, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here