आता ‘ही’ कंपनी देणार तब्बल ३० हजार लोकांना नोकऱ्या; वाचा अधिक

दिल्ली :

कोरोनामुळे आलेल्या आर्थिक संकटावर मात करताना जगभरात सगळ्यांच्या नाकी नऊ आलेले आहेत. सगळीकडे अर्थचक्राची गणिते फिस्कटलेली आहेत. भारतात गेल्या २ महिन्यात तब्बल ८० लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत, असे ndtvने दिलेल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. अशा संकटकाळातही एक कंपनी तब्बल ३० हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे.

ईकॉम एक्सप्रेस ही वस्तू व साहित्याची डिलिव्हरी देणारी कंपनी येत्या काही दिवसांमध्ये तब्बल ३० हजार लोकांना अस्थायी स्वरुपाचा रोजगार उपलब्ध करून देणार आहे. दिवसेदिंवस ई-कॉमर्स कंपन्यांकडून मागणी वाढत आहे. यापूर्वी ईकॉम एक्सप्रेसने ७५०० नवीन कर्मचाऱ्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. सध्या त्यांच्याकडे जवळपास ३० हजारपेक्षा अधिक कर्मचारी काम करत आहेत.

नव्या नोकऱ्यांची नियुक्ती १० ऑक्टोबरपर्यंत सुरू असेल. या काळात आम्ही ३० हजार लोकांना अस्थायी रोजगार देण्याचा विचार करत आहोत. ऑगस्ट महिन्यात कर्मचाऱ्यांची संख्या ३० हजार ५०० इतकी होती. गेल्या वर्षी सण आणि उत्सवांच्या आधी आम्ही २० हजार लोकांना काम दिले होते. हे काम जरी कामय स्वरुपाचे नसले तरी यातील एक तितृयांश लोकांना त्यानंतर देखील कामावर ठेवण्यात आले. कारण ऑर्डरची संख्या वाढत होती, अशी माहिती कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि HR अधिकारी सौरभ दीप सिंगला यांनी दिली आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here