ब्रेकिंग : ‘ब्लॅक लाईव्स मॅटर’चा संदेश देत नाओमीने जिंकला US ओपन..!

करोनामुळे मोजके अधिकारी, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सध्या अमेरिकन ओपन ही टेनिस स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. त्यातील महिला गटामध्ये जपानच्या नाओमी ओसाका हिने अंतिम सामना जिंकून हा किताब पटकावला आहे. तिने त्या मैदनावर वेगवेगळे मास्क घालून खेळ केला. त्याद्वारे ‘ब्लॅक लाईव्स मॅटर’चा संदेश दिला.

१९९९ मध्ये विल्यम्स भगिनींच्या खेळाने प्रभावित होऊन टेनिसशी जोडल्या गेलेल्या नाओमीने हे तिसरे ग्रँडस्लॅम जिंकून आशियाई देशातील विक्रम आपल्या नावावर केला आहे. एखाद्या आशियाई (आशिया खंडातील) खेळाडूने ३ ग्रँडस्लॅम जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. तिने अमेरिकन ओपनमध्ये बेलारूस देशाच्या व्हिक्टोरिया अजारींका हिचा १-६, ६-३,६-३ अशा सेटने पराभव केला.

पहिला सेट पिछाडीवर असताना नाओमी हा सामना जिंकण्याची शक्यता अजिबात कोणालाही वाटत नव्हती. मात्र, तिने दुसऱ्या सेटमध्ये पुन्हा सामन्यात आपण जिंकण्यासाठी लढत असल्याचा संदेश दिला. अखेरीस तिने हा किताब पटकावला. तिने मैदानात ‘ब्लॅक लाईव्स मॅटर’चा संदेश देणारे वेगवेगळे मास्क घालून जगाचे लक्ष वेधले आहे.

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here