बँक अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी SBI ने दिल्या ‘या’ सूचना; नक्कीच वाचा

या काळात बँकांचे ऑनलाइन व्यवहार करताना सातत्याने लोकांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. आजकाल आर्थिक व्यवहार करताना अनेकदा ऑनलाइन पद्धत वापरली जाते. लोकांना पुरेसे ज्ञान नसल्यामुळे हॅकर्स याचा गैरफायदा घेतात. त्यामुळे बँक अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी काही खास सूचना ट्विटरवरून केल्या आहेत. डेटा चोरी आणि व्हायरस इन्फेक्शन साठी जबाबदार यूएसबी डिव्हाईसेजचा वापर करताना सुरक्षित राहा, याची पद्धत स्टेट बँक ऑफ इंडियाने सांगितली आहे.

अशा पद्धतीने काळजी घ्या :

  • यूएसबी डिव्हाईसला अॅक्सेस करण्याआधी लेटेस्ट अँटिव्हायरस स्कॅन करा.
  • डिव्हाईसवर पासवर्ड प्रोटेक्शन लावून ठेवा.
  • बँक स्टेटमेंट संबंधी फाईल्स आणि फोल्डर्सला एनक्रिप्ट करुन ठेवा.


या गोष्टी करू नका :-


१) अज्ञात लोकांपासून कोणत्याही प्रकारची प्रमोशनल डिव्हाईस अॅक्सेप्ट करु नका. 

२) कधीही आपली सेन्सिंटिव्ही माहिती, जशी बँक डिटेल्स आणि पासवर्ड यूएसबी डिस्क वर ठेवू नका.

३) कधीही व्हायरस इन्फेक्टेड सिस्टम मध्ये आपला यूएसबी डिव्हाईस प्लग इन करू नका.

संपादन : सचिन पाटील

ट्रॅक्टरचलीत उत्तम औजारे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे आमचे विश्वराजचे दुकान..👍

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, September 6, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here