ब्रेकिंग : अमित शाह पुन्हा रुग्णालयात; दिल्लीतील AIIMS मध्ये उपचार सुरू

भारताचे गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शाह यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. शनिवारी रात्री उशिरा ११ वाजता त्यांना दिल्लीतील AIIMS मध्ये दाखल करण्यात आले.

त्यांना सध्या रुग्णालयाच्या कार्डियो न्यूरो टावर येथे दाखल करण्यात आलेले आहे. २ ऑगस्ट २०२० रोजी शाह यांची करोना टेस्ट पॉजिटिव्ह आलेली होती. त्यानंतर त्यांच्यावर गुरूग्राम येथील मेदांता हॉस्पिटलात उपचार करण्यात आले. १४ ऑगस्ट रोजी त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली होती. त्यानंतरही त्यांना श्वास घेण्यात अडचण येत असल्याने १८ ऑगस्टपासून रुग्णालयातून त्यांनी मंत्रालयाचे कामकाज पाहिले होते. मात्र, ३१ ऑगस्टला त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. आता त्यांना दाखल करताना नेमके कारण अजूनही समजलेले नाही.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here