बिहार निवडणूक हा सध्या ट्रेंडमध्ये असलेला मुद्दा आहे. या राज्यात जनता दल युनायटेड आणि भाजपची सत्ता राहणार की लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला पुन्हा सत्ता मिळणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे. त्यातच लालुपुत्र तेजस्वी यांनी चक्क अध्यक्ष असलेल्या वडील लालूप्रसाद यांनाच पोस्टरवरून गायब करून टाकले आहे.
सध्या राज्यभरात तेजस्वी यांनी पोस्टर लावण्यासह सोशल मीडियामध्ये जाहिरातबाजी सुरू केली आहे. त्यामध्ये एकमेव नेता दाखवण्यात येत आहे. ते आहेत स्वत: तेजस्वी यादव. त्यांनी वरती छोटा फोटो म्हणूनही त्यात लालूंना स्थान दिलेले नाही. हे लालूंच्या संमतीने चालू आहे की त्यांना डावलून हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. मात्र, यामुळे पक्षाचे जुने कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत.
‘नई सोच, नया बिहार, युवा सरकार, अबकी बार’ असा संदेश देणारे पोस्टर सध्या बिहारमध्ये झळकत आहेत. सध्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात लालूप्रसाद यादव तुरुंगात आहेत. अशावेळी पक्षाची सूत्रे पुत्र तेजस्वी यांनी ताब्यात घेतली आहेत. मात्र, अशावेळी सध्या फोटोतही लालूप्रसाद दिसत नसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
संपादन : सचिन मोहन चोभे
- म्हणून शेतकरी-सरकार बैठक ठोस निर्णयाविनाच संपली; पहा नेमके काय झालेय
- आले की अच्छे दिन; प्रत्येकाला मिळणार 1 लाख रुपये, पहा कोणी घेतलाय जनहिताचा निर्णय
- भाजीपाला मार्केट अपडेट : एकाच क्लिकवर पहा पालक, शेपू, कोथिंबीर, मेथीसह पातीचे बाजारभाव
- कांदा मार्केट अपडेट : पहा सोलापूर, पारनेरला किती भाव खातोय कांदा
- मुंबई बाजारभाव : पहा एकाच क्लिकवर संपूर्ण पिकांचे मार्केट अपडेट