आघाडी सरकार बरखास्त करा, राष्ट्रपती राजवट लागू करा; ‘या’ केंद्रीय मंत्र्यांची मागणी

मुंबई :

आजवर अनेक भाजप नेत्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. विविध प्रकरणांवरून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भाजप नेत्यांकडून होत असते. सध्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मदन शर्मा नामक व्यक्तीला मारहाण प्रकरणावरून वाद सुरु झाले आहेत. भाजपने या विषयावर आक्रमक भूमिका घेतली आहे. मदन शर्मा यांची कन्या शीला शर्मा यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, असे म्हटले आहे. यानंतर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केली आहे.

आठवले यांनी म्हटले आहे की, ज्यांच्यावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे असा सत्ताधारी शिवसेना पक्ष सूडबुद्धीने काम करतोय. निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्यावर शिवसेना कार्यकर्त्यांनी जबरी हल्ला केला. त्या हल्ल्याचे समर्थनही शिवसेनेने केले आहे. तसेच हे हल्लेखोर जामिनावर बाहेर असल्याचेही आठवले यांनी सांगितले.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी, यासाठी केंद्रात प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, राज्यात वातावरण गढूळ झाले आहे. सूडबुद्धीने वागणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला बरखास्त केले पाहिजे अशी मागणी पुढे आली आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here