मराठा आंदोलनाबाबत बैठकीत झाला मोठा निर्णय; आमदार, खासदारांना दिला ‘हा’ इशारा

मुंबई :

चालू वर्षी सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे महाराष्ट्रातील मराठा समाजात नाराजी पसरलेली आहे. काही मराठा संघटना आता आक्रमक पवित्र घेऊ शकतात असे चिन्ह आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या स्थगितीच्या निर्णयानंतर विविध प्रतिक्रिया मराठा समाजात उमटल्या आहेत. अशातच मराठा संघटनांनी तसेच मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करण्यासाठी राज्य सरकारला ३ दिवस वेळ दिला होता. अद्यापही भूमिका स्पष्ट न केल्यामुळे नाशिकमध्ये सकल मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती.

या बैठकीत भाजप आमदार देवयानी फरांदे याही उपस्थित होत्या. त्या बोलायला उठल्यावर मात्र बराच गोंधळ झाला. मराठा समाजातील एका गटाचा फरांदे यांना विरोध आहे. त्यांच्या भाषणाच्या वेळी काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

या बैठकीनंतर  मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर यांनी इशारा दिला आहे की, जो आमदार, खासदार शासनाला अथवा आपल्या पक्षाच्या वरिष्ठांना खुले पत्र देणार नाही. त्यांच्याविरोधात गमिनी कावा पद्धतीने आंदोलन करण्यात येईल. मराठा समाजाच्या वतीने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्र देण्यात येणार आहे.    

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here