कंगना चुकलीच… ‘त्यांच्या’ अकलेची कीव करावीशी वाटते; वाचा भाजप प्रवक्त्यांची त्या प्रकरणाबाबत भूमिका

मुंबई :

सध्या महाराष्ट्रात राजकीय घडामोडी मोठ्या वेगाने घडत आहेत. विविध प्रकरणे, टीकाटिप्पणी, मागण्या यावरून करोनाच्या या अवघड काळातही राजकारण सुरूच आहे. अशातच भाजपने कंगना- शिवसेना वादावर आपली भूमिका स्पष्ट केलीच होती. पण आता भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी कंगना चुकली असल्याचे स्पष्ट केले. ‘कंगनाने मुंबईची तुलना POK बरोबर केली हे चुकीचे आहे. पण म्हणून कंगनावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा म्हणणाऱ्यांच्या अकलेची कीव करावीशी वाटते’, असे म्हणत वाघ यांनी टोला लगावला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, POK हा भारताचा अविभाज्य भाग आहे व सदैव राहिल. POK पाकिस्तानला तिबेट प्रमाणे आंदण द्यायला हे काही नतद्रष्ट कॉंग्रेसचे सरकार नाही.

या दरम्यान वाघ यांनी मराठीचा मुद्दा पुढे आणत त्यावरही भाष्य केले आहे. त्यांनी सांगितले की, मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी संस्कृती व महाराष्ट्राचा मानबिंदू मुंबई यावर अशी वेळ का यावी की तिला वाचवण्यासाठी समस्त मराठी माणसांना साद घालावी लागत आहे? खरं तर मराठी वाढतेय, बलवान होतेय. दुर्बळ होताहेत ते मराठीचे फुकटे सौदागर वेळ येऊ नये पण आलीच तर मराठीसाठी पहिली आहुती माझी असेल.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here