मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री काय म्हणालेत ते वाचा; फेसबुक लाइव्हमध्ये मांडली भूमिका

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक पेजवर लाइव्हमध्ये बोलताना मराठा आरक्षणावर भूमिका मांडली आहे. त्यांनी यातून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे.

त्यांनी म्हटले आहे की, गेल्या आठवड्यात मराठा आरक्षणाचा विषय समोर आला आहे. खरं म्हणजे हा विषय अशा पद्धतीने येण्याची काही आवश्यकता नव्हती. महाराष्ट्र राज्यातील सर्व पक्षांनी एकमताने मराठा समाजाच्या न्यायहक्काच्या लढ्याला न्याय देण्यासाठी मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला. मराठा आरक्षणाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं गेलं, ते आपण जिंकलो. सर्वोच्च न्यायालयातील लढाई आपण लढत आहोत. ही लढाई लढताना पहिल्या सरकारने जे वकील दिले, त्यात आपण कोणीही बदलले नाही, देशातील सर्वोत्तम वकील आपण दिले आहेत. कुठेही आपण कोर्टमध्ये अर्ग्युमेंट करायला कमी पडलो नाही.

हा निकाल आपल्या बाजूने लागावा यासाठी आपल्याला कायदेशीर लढाई करायची आहेच, ती करण्यात कुठे तसूभरसुद्धा हे सरकार मागे राहणार नाही हे वचन मी परवाच दिलं आहे, आज सुद्धा देत आहे. म्हणून मी आपल्याला विनंती करतोय, सरकार आपल्यासोबत आहे, सरकारने निर्णय घेतलेला आहे. कोरोनाच्या संकटात अधिक आंदोलन, मोर्चे कृपा करून काढू नका. त्याची आवश्यकता नाही, संपूर्णपणे सरकार हे तुमच्या भावनेशी सहमत आहे, तुम्हाला न्याय मिळवून देणं हे आमचे कर्तव्य आहे, आम्ही वचनबध्द आहोत. आपण सगळे एकत्र आहोत, एकजुटीने हा न्याय मिळवून घेतल्याशिवाय थांबायचं नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पुढील मुद्दे…

Posted by CMOMaharashtra on Sunday, September 13, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here