करोनाबाबत फेसबुक लाईव्हमध्ये मुख्यमंत्री म्हणाले की; वाचा सविस्तर मुद्दे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक पेजवर लाईव्हमध्ये महाराष्ट्रातील नागरिकांशी संपर्क साधला. त्यांनी म्हटले की, आपल्याशी बोलायला सुरुवात करण्यापूर्वी मी सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना, सर्व धर्मियांना मनापासून धन्यवाद देत आहे. मला एका गोष्टीचे समाधान आहे की सगळ्यांनी एक सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून संयम पाळला, तुम्हाला खरंच धन्यवाद देतो. ३ गोष्टी एकत्र आलेल्या आहेत, आपले आयुष्य पूर्वपदावर आणणे, त्यात सणासुदीचे दिवस व पावसाळा. मला भीती होती आणि आहेच, ती समोर दिसत आहे. कोरोनाचे संकट वाढत चालले आहे. वाढता वाढता वाढे अशी त्याच परिस्थिती आहे. संपूर्ण जगामध्ये दुसरी लाट आली की काय असे भीतीदायक चित्र आपल्यासमोर येत आहे.

सगळेच जण आपापली जबाबदारी ओळखून, सामाजिक भान ठेऊन वागत आहेत. काही जणांना वाटत असेल की आता कोरोना संपला आहे. पुन:श्च हरी ओम म्हणजे आपलं राजकारण पुन्हा सुरू करावं. केलंही असेल, सुरु करायला काही हरकत नाही. तूर्त मी राजकारणाबद्दल काही बोलणार नाही. महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव आखला जातोय, त्याच्याबद्दल एकदा मात्र मी जरूर मुख्यमंत्रीपदाचा मास्क थोडावेळ बाजूला ठेऊन आपल्याशी बोलणार आहे. त्यातले सुद्धा धोके आणि एकूण ज्या गोष्टी आहेत त्या आपल्यासमोर नक्की मांडणार आहे. मी बोलत नाही आहे, याचा अर्थ असा नाही की माझ्याकडे उत्तर नाही.

महाराष्ट्रामध्ये वाताहत झाली असं नाही. पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये मग पूर्व विदर्भातील पुर परिस्थिती, निसर्ग चक्रीवादळ, मधल्या काळात अघोषित वादळ मुंबईत येऊन गेलं, अशा अनेक परिस्थितीत सरकार खंबीर पावले टाकत आहे, यशस्वीपणे पुढे चाललेलं आहे. हे केवळ आपल्या आशीर्वादाचेचं बळ आहे. कोरोनाचे संकट हे आता आक्राळविक्राळ रूप धारण करेल अशी जगभर चिंता व्यक्त केली जाते. WHO या संस्थेने सांगितले आहे की कदाचित ही पुढच्या अधिक भीषण संकटाची नांदी असू शकेल. घाबरण्याचे काम नाही आहे, पण खबरदारी घेतलीच पाहिजे.

संपादन : सचिन मोह चोभे

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पुढील मुद्दे…

Posted by CMOMaharashtra on Sunday, September 13, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here