ब्रेकिंग : कंगनाचा ‘तो’ व्हीडीओ होतोय व्हायरल; पहा त्यात नेमके काय म्हटल्याने येणार अडचणीत

सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि स्वतःला झाशीची राणी म्हणवून घेणाऱ्या कंगना राणावत यांचा एक व्हीडीओ सध्या सोशल मिडीयामध्ये जोरात ट्रेंडमध्ये आहे. त्यात कंगना यांनी आपण अमलीपदार्थ सेवन करीत होतो आणि त्या व्यसनाच्या पूर्ण आहारी गेल्याचेही म्हटले आहे.

एकूणच यानिमित्ताने पुन्हा एकदा कंगना या चर्चेत येत आहेत. एकेकाळी कंगना यांचा मित्र असलेल्या अध्ययन सुमन यांनी २०१६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका मुलाखतीत म्हटले होते की, २००८ मध्ये कंगना यांनी अध्ययन यांना एका पार्टीत ड्रग घेण्यासाठी आग्रह केला होता.

तसेच मार्चमध्ये कंगना यांनीच त्यांच्या इन्स्टाग्राम खात्यावर शेअर केलेल्याएका व्हीडिओमध्ये कंगना सांगत आहेत की, जैसी ही मैं घर से भागी, डेढ़-दो साल में एक फिल्म स्टार थी, एक ड्रग एडिक्ट थी. मेरी जिंदगी में इतने सारे कांड चल रहे थे कि मैं ऐसे लोगों के हाथ लग चुकी थी, जहां इतना सब खतरनाक हो चुका था मेरे जीवन में. जब इतना सब हो रहा था मेरी लाइफ में तब में टीनएजर ही थी.

अशा पद्धतीने कंगना यांनीच शेअर केलेला व्हीडिओ आणि अध्ययन यांच्या मुलाखतीचा भाग यामुळे कंगना आता संकटात सापडणार आहेत. स्वतःच एकेकाळी ड्रगी असल्याचे कंगना यांनी त्यात कबुल केले आहे. अध्ययन यांनी याबाबत जास्त बोलण्याचे टाळले आहे. मात्र, आता याचाच धागा पकडून मुंबई पोलिसांनी कंगना यांच्यावर अमलीपदार्थ सेवन केल्याचा मुद्द्यावर तपासात घेण्याची तयारी केल्याचे एनडीटीव्ही यांच्या वेबसाईटवर म्हटले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here