नाबार्डच्या चेअरमनांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती; पहा पीककर्ज याबाबत काय म्हटलेत ते

नाबार्ड म्हणजे राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक. या बँकेकडून प्रतिवर्षी शेतकऱ्यांना कमी व्याजदरावर कर्जाचा पुरवठा केला जातो. यंदा कोविड १९ आणि लॉकडाऊन यामुळे या बँकेकडून १.२० लाख कोटी रुपयांचे पीककर्ज वितरणाचा लक्षांक ठेवण्यात आलेला आहे.

CII च्या कार्यक्रमात बोलताना नाबार्डचे चेअरमन जी. आर. चिंताला यांनी ही महत्वाची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मागील आर्थिक वर्षात ९० हजार कोटींचे पीककर्ज वितरण झाले होते. यंदाही आतापर्यंत ४० हजार कोटींचे कर्ज वितरण झालेले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here