मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री ठाकरेंची आहे ‘ही’ भूमिका; आंदोलनाबाबत सांगितली ‘ही’ महत्वाची माहिती

मुंबई :

आज जनतेशी संवाद साधत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी ट्रेंडमध्ये असलेल्या मराठा आरक्षण या विषयावर भाष्य केले. ते म्हणाले की, मराठा आरक्षणाची तुम्हा सर्वांची जी भावना आहे, तीच आमचीसुद्धा भावना आहे. तुमच्या मागण्या या राज्य सरकारच्या मागण्या आहे. मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात राज्य सरकारने पूर्ण ताकदीने बाजू मांडली आहे. पण मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. आत जी गरजेची स्थगिती नव्हती, ती देण्यात आली आहे हे अनाकलनिय आहे.

पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, मराठा समाजाच्या सर्व सुचनांचा विचार करून रणनीती आखत आहे.  ज्या मराठा संघटना आहे, जी लोकं आहे त्यांच्याशी बोलत आहे. अशोक चव्हाण आणि इतर नेत्यांशी बोलणे सुरू आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर बोलणं झालं आहे. 

दरम्यान कोरोनाच्या परिस्थितीत आंदोलन काढू नका, तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे, राज्य सरकारचे ते कर्तव्यच आहे. मराठा समाजातील बंधू, भगनींनी अफवांना बळी पडू नये, कुणाच्या बोलण्यात येऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरेंनी केले. तसेच गैरसमज पसरवू नका, असेही त्यांनी म्हटले.

संपादन : स्वप्नील पवार

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here