रविवार स्पेशल : सुशांतच्या निमित्ताने पहा ‘गांजेडी’चा इतिहास आणि भूगोलही

महाराष्ट्रात गांजा हा शब्द काही कोणाला नवीन नाही. लहानपणीच कानावर अनेकदा “गांजा पिऊन आलास का” असे तुमच्याही कानावर आलेले असेल. अशा प्रकारे सहजगत्या आपल्याला गांजा पुरणाची माहित होते. सोशल मीडियावर कित्येक पत्र शेतकऱ्यांनी लिहिलेली दिसतात की “शेती परवडत नाही; गांजा लावायला परवानगी द्या”. गांजा म्हणले की चष्म्यातून उस्तुक्तेने पाहणारी जनता थोडी नाही. नेमके हेच काय आहे गांजा प्रकरण आपण एकदा समजून घेऊ या..!

इंग्रजांच्या काळात या गांजावर थोडं फार काम झालेलं आहे. सन १८९३ साली ‘ इंडियन हेम्प ड्रग्ज कमीशन’  नावाची समिती यावर संशोधन करत होती. त्यांनी तब्बल १२०० लोकांचे अनुभव नोंदवले होते. यावर जो ३०० पानांचा अहवाल तयार केला होता. त्यामध्ये त्यांनी गांजा सेवन हे शरीरास हानिकारक नाही असे त्यामध्ये नोंदवले आहे. या १२०० लोकांच्यामध्ये डॉक्टर, हमाल, फकीर, शेतकरी, अधिकारी, गांजा तस्कर, ऑफिसर आदी लोकांचा सहभाग होता. या कमीशनच्या अहवालानुसार गांजाचे प्रमाणात केलेलं सेवन हे शारीरिक, मानसिक दृष्ट्या हानिकारक नाही. मात्र, याचे अतिसेवन केले गेले तर नक्कीच धोका संभवतो अशी माहिती त्यावेळी नोंदवली गेलेली आहे.

शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील मार्केट, पॉलिटिकल & इकॉनॉमिक अपडेट्ससाठी पेज लाईक करून 'सी फर्स्ट' म्हणा..

Posted by कृषीरंग on Monday, September 7, 2020

गांजा या वनस्पतीला पुराणात धार्मिक आधार आहे. पूर्वीच्या काळी माणसांवर शस्त्रक्रिया करताना याचा वापर केला जात असे. आयुर्वेदशास्त्र यानुसार गांजा ही औषधी वनस्पती म्हणून समजली जाते. तसेच सध्याच्या काळात जो व्यक्ती सतत गांजा पितो त्याला “गांजेडी” असा शब्दप्रयोग केला जातो. आपल्या देशात गांजावर बंदी ही १९८५ साली स्व. पंतप्रधान राजीव गांधी यांनी घातली. Narcotic Drug And Psychotropic Substances Act, 1985 या कायद्याअंतर्गत अंमली पदार्थावर बंदी घालण्यात आली. ज्यामध्ये गांजा बेकायदेशीर ठरवण्यात आला. 

आताच्या काळात गांजा जवळ बाळगणे, सेवन करणे किंवा विकणे हा कायद्याने गुन्हा आहे. जर व्यक्तीच्या जवळ १ किलो गांजा सापडला तर १ वर्ष तुरुंगवास आणि आणि १० हजार दंड. तसेच २० किलो गांजा सापडला तर व्यापारी प्रमाण समजून १० ते २० वर्ष तुरुंगवास आणि २ लाखापर्यंत दंड होऊ शकतो. याच बरोबर या दोन्हींच्यामध्ये गांजाचे प्रमाण एखाद्याकडे सापडले तर १० वर्ष तुरुंगवास आणि १ लाख रुपये दंड असे या गुन्ह्याचे स्वरूप आहे. 

सुशांत सिंग, रिया चक्रवर्ती, कंगना राणावत (त्यांनी बॉलीवूडच्या २५ जणांची यादी सांगण्याचे जाहीर केले आहे) आणि इतरांच्या सध्या बातम्या याच गांजा आणि इतर अमलीपदार्थ यांच्यासाठी येत आहेत. आपणही या गांजापासून दूर राहा आणि इतरांना यापासून दूर ठेवण्यासाठीचे प्रयत्न करा. कारण, गांजामुळे माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो हे सुशांतच्या प्रकरणातून स्पष्ट दिसतेय की.. आणि माणूस यामुळे काहीबाही बडबड आणि कृत्य करू शकतो हे तर तुम्ही जनताच की..!

संदर्भ : the wire, Wikipedia

संपादन : गणेश शिंदे

ट्रॅक्टरचलीत उत्तम औजारे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे आमचे विश्वराजचे दुकान..👍

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, September 6, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here