त्यांना फक्त दगडी मारायला मराठी माणूस पाहिजे; शिवसेनेच्या माजी खासदाराने सांगितला उद्धव ठाकरेंचा ‘तो’ किस्सा

मुंबई :

करोनाच्या या महाभयंकर संकटातही सध्या सगळीकडे राजकारण चालूच आहे. राज्य सरकारवर भाजप विविध मुद्द्यांना घेऊन टीका करत आहे. राणे पिता-पुत्र तर शिवसेनेवर टीका करण्याची संधीच शोधत असतात. गेल्या २-३ दिवसांपासून मराठी, मुंबई, महाराष्ट्र हे तीन मुद्दे ट्रेंड मध्ये आहेत. माजी खासदार व भाजप नेते निलेश राणेंनी ट्वीट करत एक किस्सा सांगितला आहे.

त्यांनी ट्वीट म्हटले की, आम्ही शिवसेनेत असताना असाच एक दिवस आम्ही कुटुंब जेवायला एका ठिकाणी गेलो, आम्हाला कळलं की उद्धव ठाकरे तिथे आलेत, आम्ही भेटून निघालो पण बघितलं 90% त्यांचे मित्र अमराठी होते, यांना बाहेरगावी फिरायला सोबत अमराठीच लागतात. फक्त दगडी मारायला मराठी माणूस पाहिजे, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

यावेळी त्यांनी संजय राऊत यांनाही लक्ष केले. राणे म्हणाले की, पवार आणि ठाकरे महाराष्ट्राचे ब्रँड आहेत, असे राऊत म्हणतात. त्याला सांगा जगात ब्रँडची निर्मिती वस्तू विकायला केली जाते म्हणजे महाराष्ट्र विकला असं म्हणायचय काय??? महाराष्ट्राने अनेक लोकांना मोठं केलं, हे राज्य कोणाच्या बापाचे नाही. हे राज्य जनतेने मोठे केले कुठल्या विकाऊ ब्रँडने नाही.

संपादन : स्वप्नील पवार

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here