टॉमेटोचे भाव थेट ८५ रुपये किलोवर; पावसामुळे पिक खराब झाल्याचा बाजारात परिणाम

महत्वाचे नगदी पिक असलेल्या टॉमेटोचे भाव सध्या तेजीत आहेत. दिल्लीत तर किरकोळ विक्री करणाऱ्या भाजीवाल्यांनी सध्या ८०-८५ रुपये किलोने टॉमेटो विकण्यास सुरुवात केली आहे. तर, दिल्लीतील आझादपूर मार्केटमध्ये सध्या घाऊक बाजारात टॉमेटो ४०-६० रुपये किलो दराने विकला जात आहे.

देशभरात प्रतिवर्षी १.९७ कोटी टन इतके टॉमेटोचे उत्पदान होत असते. मात्र, यंदा लॉकडाऊन कालावधीत या पिकाचे भाव १-२ रुपये किलो इतके खाली आले होते. शेतकऱ्यांना त्यावेळी आपला टॉमेटो फेकून द्यावा लागला होता. नंतर, लॉकडाऊनची शक्यता असल्याने काही भागात याची लागवड कमी झाली तसेच काही भागातील टॉमेटो खराब झाल्याने सध्या बाजारात मागणीच्या तुलनेत फ़क़्त ६० टक्के टॉमेटो येत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे याने दिल्लीत उच्चांकी भाव घेतला आहे.

ट्रॅक्टरचलीत उत्तम औजारे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे आमचे विश्वराजचे दुकान..👍

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, September 6, 2020

सध्या दिल्लीत भाजी बाजारात ८०-८५ असलेल्या टॉमेटोला ऑनलाईन विक्री करणाऱ्या प्लॅटफॉर्मवरही चांगला भाव आहे. सरकार म्हणत आहे की, टॉमेटो दिल्लीत ६० रुपये भावाने विकला जात आहे. तर, मदर डेअरी यांच्या दुकानात ७८ रुपये, ग्रोफर्स यावर ७५ रुपये, बिग बास्केट यावर ६० रुपये किलो या दराने याची विक्री केली जात आहे.

उत्तर प्रदेश, राजस्थान, झारखंड, पंजाब, तमिलनाडु, केरल, जम्मू-कश्मीर आणि अरुणाचल प्रदेश या भागातील टॉमेटो पिकाचे मोठ्या प्रमाणात निकासन झालेले आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागला आहे. ज्यांच्याकडे बऱ्यापैकी टॉमेटो आहेत त्यांना मात्र यामुळे लाभ झालेला आहे.

संपादन : माधुरी सचिन चोभे

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here