गुड न्यूज : ऑक्सफर्डच्या लसबाबत आली महत्वाची बातमी; ट्रायल झाल्या पुन्हा सुरू

इंग्लंडमध्ये एका व्यक्तीला लस दिल्यावर दुष्परिणाम दिसल्याने ऑक्सफर्ड विद्यापीठातर्फे (Oxford University) विकसित केल्या जात असलेल्या लसच्या क्लिनिकल ट्रायल रोखण्यात आल्या होत्या. मात्र, त्या पुन्हा सुरू करण्यात आलेल्या आहेत.

ऑक्सफर्ड विद्यापीठ म्हणजे जगाच्या विकासामध्ये ठोस भूमिका बजावलेली संस्था अशी ओळख आहे. याच विद्यापीठ आणि एस्ट्राजेनेका (AstraZeneca) या खासगी कंपनीने मिळून जगात AZD1222 ही लस विकसित केली जात आहे. अवघ्या जगाला त्यामधून मोठय अपेक्षा आहेत. त्यातच एका रुग्णाला दुष्परिणाम दिसल्याने याच्या ट्रायल दि. ६ सप्टेंबर २०२० पासून बंद करण्यात आलेल्या होत्या. मात्र, अखेरीस त्या रुग्णाच्या इतर माहिती आणि चाचण्या घेऊन ही लस सुरक्षित असल्याचा निर्वाळा मिळाल्यावर पुन्हा एकदा याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल चालू झाल्या आहेत.

भारतातही सिरम संस्थेने याच्या ट्रायल बंद केलेल्या आहेत. त्याही सुरू होण्यासाठी आता हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. युरोप अमेरिकेत या लसच्या तिसऱ्या टप्प्याच्या ट्रायल चालू आहेत. त्यांच्यामुळे सुखद बातमी मिळण्याची अवघ्या जगाला आशा आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

ट्रॅक्टरचलीत उत्तम औजारे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे आमचे विश्वराजचे दुकान..👍

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, September 6, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here