वाचा रेल्वे भरतीची ‘ही’ महत्वाची बातमी; मुदत फ़क़्त दोनच दिवस

भारतीय रेल्वेमध्ये नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यासाठी मोठी संधी आहे. कारण, काही दिवसांपूर्वी रेल्वेने 4499 पदांवर भरती करण्याची घोषणा केली होती, त्यात आता आणखी 432 जागा वाढवण्यात आलेल्या आहेत.

स्टेनोग्राफर, फिटर, इलेक्ट्रीशियन, वायरमन, इलेक्ट्रॉनिक मॅकेनिक, आरएसी मॅकेनिक, वेल्डर, प्लंबर, प्रिंटर, कारपेंटर, टर्नर अशा विविध ट्रेडसाठी ही भरती होणार आहे. आता याच्या जागा 4931 झाल्या आहेत. कोणतीही परिक्षा न देता 10 वी पास ते आयटीआय उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

एनएफआर (Northeast Frontier Railway) डिव्हिजनमध्ये ही भरती केली जाईल. भरतीसाठी रेल्वे रिक्रुटमेंट सेल (RRC) द्वारे अधिकृत नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. यानुसार 16 ऑगस्टपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तसेच, याची अंतिम तारीख दि. 15 सप्टेंबर 2020 असणार आहे.

संपादन : विनोद सूर्यवंशी

शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील मार्केट, पॉलिटिकल & इकॉनॉमिक अपडेट्ससाठी पेज लाईक करून 'सी फर्स्ट' म्हणा..

Posted by कृषीरंग on Monday, September 7, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here