अशा पद्धतीने भारतीय सैन्याने चीन्यांना दिलाय झटका; वाचा महत्वाची बातमी

भारत-चीन सीमावाद गंभीर वळणावर नेऊन ठेवणाऱ्या चीन्यांना आता भारतीय सैन्याने जोरदार झटका दिला आहे. चर्चा चालू असतानाच महिनाभरात योग्य नियोजन करून भारतीय सैन्याने पॅगॉंग झील या भागातील मोक्याच्या जागांवर कब्जा केला आहे. त्यामुळे चीनचे मनसुबे धुळीत मिसळले गेले आहेत.

भारतीयांना चर्चेत अडकून ठेवतानाच चाल करण्यासाठी चीनी सैन्य सज्ज असल्याचे ताडून भारतीय सैन्याने लडाखमधील भागात योग्य नियोजन करून चीनला शह दिला आहे. त्यामुळे तोंडघशी पडलेल्या चिन्यांचा तिळपापड झालेला आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार सैन्य दलातील सूत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध झालेल्या बातमीतून हे स्पष्ट झालेले आहे. फिंगर पाच क्षेत्रात त्यामुळे भारतीय सैन्याची पकड मजबूत झालेली आहे.

२९-३० ऑगस्ट २०२० या दिवशी भारतीय सैन्याने मोक्याच्या ठिकाणी कब्जा केला. नंतर तिथे कब्जा करण्यासाठी आलेल्या चीनी सैनिकांना त्यामुळे पाठीमागे निघून जावे लागले आहे. यानिमिताने भारतीय सैन्याने चीनला योग्य शह दिल्याने कौतुक होत आहे. भारतीय हद्दीवर वचक ठेवण्याच्या उद्देशाने चीनचे प्रयत्न यामुळे यशस्वी झालेले नाहीत.

संपादन : सचिन पाटील

शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील मार्केट, पॉलिटिकल & इकॉनॉमिक अपडेट्ससाठी पेज लाईक करून 'सी फर्स्ट' म्हणा..

Posted by कृषीरंग on Monday, September 7, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here