ब्ल्यूटूथ वापरातानाचा धोका आहे का माहित; नसेल तर हे नक्कीच वाचा

मोबाइल फोनला असलेली ब्ल्यूटूथ ही डाटा ट्रान्स्फर करणारी सुविधा अनेकजण जोरात वापरत असतात. एकमेकांचा फोन जोडून माहितीचे आदान-प्रदान करण्यासह हेडफोन लावण्यासाठी आणि अनेकदा तर इंटरनेट जोडणीसाठीही आपण हे वापरतोच की. मात्र, त्याचेही काही धोके आहेत.

ब्ल्यूटूथ डिव्हाइस जोडण्याच्या दरम्यान आपल्या दोन्ही मोबाइलला थेट जोडणी करून डाटा चोरी होत असल्याची शेकडो प्रकरणे आता लक्षात येण्यास सुरुवात झालेली आहे. ज्यांच्या मोबाईलमध्ये ४.० आणि ५.० हे ब्ल्यूटूथ व्हर्जन आहेत. त्यांच्यासाठी हा धोका आहे. ज्यांच्याकडे ५.१ हे व्हर्जन आहे त्यांच्या मोबाइलला याचा धोका नाही. मात्र, त्यामुळे लवकरच अशा मोबाईलवर सुरक्षा पॅचेस मिळणे ही गरज बनली आहे.

क्रॉस-ट्रांसपोर्ट की डेरिवेशन (CTKD)  दरम्यान मोबाइल जोडणी करताना BLURtooth द्वारे अशा पद्धतीने पर्सनल डाटा चोरीसाठीचे प्रयत्न होण्याची शक्यता असल्याचे CNET यांच्या ताज्या रिपोर्टमध्ये म्हटलेले आहे. एकूणच आपल्या वैयक्तिक माहितीची सुरक्षितता लक्षात घेऊन आपण सगळ्यांनी ब्ल्यूटूथ डिव्हाइस जोडणी करताना आणि त्याचे पासवर्ड चोरले जाणार नाहीत याचीही काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

संपादन : सचिन पाटील

शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील मार्केट, पॉलिटिकल & इकॉनॉमिक अपडेट्ससाठी पेज लाईक करून 'सी फर्स्ट' म्हणा..

Posted by कृषीरंग on Monday, September 7, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here