म्हणून मास्क वापरायलाच पाहिजे; पहा करोनाशी दोन हात करायला मास्कचा उपयोग काय आहे ते

जगभरात मास्क वापरायला सांगितले जात. मात्र, अम्स्क वापरून काय होणार असाच सूर आता अनेकांकडून लावला जात आहे. त्याचवेळी अमेरिकेत झालेल्या संशोधनानुसार मास्क वापरण्याचे फायदे पुढे आलेले आहे. होय, मास्क वापरल्याने इम्युनिटी पॉवर वाढण्यासह अँटिबॉडीज डेव्हलप होण्यासह मदत होत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

ट्रॅक्टरचलीत उत्तम औजारे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे आमचे विश्वराजचे दुकान..👍

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, September 6, 2020

न्‍यू इंग्‍लैंड जर्नल ऑफ मेडिसिन यांच्याकडे कॅलिफोर्निया यूनिवर्सिटी येथील मोनिका गांधी आणि जॉर्ज रदरफोर्ड यांनी केलेल्या संशोधनाचा अहवाल प्रसिध्द झाला आहे. त्यात म्हटले आहे की, मास्क वापरल्याने गळून हवा येताना १०० टक्के करोनाचे विषाणू रोखले जातात असे अजिबात नाही. मात्र, जे काही विषाणू त्याद्वारे येऊ शकतात ते तितकेसे प्रभावी नसतात. असे विषाणू जर चुकून-माकून मास्कद्वारे शरीरात आलेच तर अँटिबॉडीज डेव्हलप होण्यासाठी मदत होते. म्हणजेच यामुळे इम्युनिटी पॉवर वाढण्यास मोठी मदत होते.

करोना विषाणूपासून वाचण्यासाठीचा एकमात्र उपाय सध्या आहे तो म्हणजे सर्वांनी एकमेकांची काळजी घेणे. त्यामध्ये वैयक्तिक अंतराचा नियम पाळण्यासह मास्क नियमितपणे वापरणे आवश्यक आहे. दिल्लीत अनेकांना अँटिबॉडीज डेव्हलप झालेल्या पाहायला मिळत आहे. त्यामध्ये मास्क वापरण्याचा वाटा मोठा आहे. त्यासाठी यापुढेही सर्वांनी मास्क वापरून सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here