म्हणून WHO ने पाकिस्तानसह ‘त्या’ १० देशांचे केले कौतुक..!

सध्या जगभरात करोनाचे थैमान चालू आहे. भारतातही कोविड १९ चे रुग्ण दररोज हजारोंनी वाढत आहेत. त्याचवेळी हिंदी आणि इंग्रजी न्यूज चॅनेलमध्ये करोनामुळे तडफडत असल्याचे दिसत असलेल्या पाकिस्तानात वास्तवात वेगळे चित्र आहे. पाकिस्तान आणि इतर १० देशांनी करोना विषाणूला हरवण्यासाठी केलेल्या कामाचे उलट जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केले आहे.

पाकिस्तान या भारताच्या शेजारी असलेल्या गरीब आणि मुजोर देशातील स्थिती वृत्तवाहिनीचे पत्रकार दाखवतात त्याच्या अगदीच उलट असल्याचे सिद्ध झालेले आहे. करोनामुळे पाकिस्तान पार कोलमडून पडल्याचे माध्यमांतून चित्र दाखवले जाताअसतानाच या देशाने जगातील पहिल्या दहा देशांमध्ये स्थान पटकावले आहे. तेही करोना विषाणूला आटोक्यात आणणाऱ्या देशांच्या यादीत.

या यादीत पाकिस्तानसह थायलंड, कंबोडिया, जपान, न्यूझीलंड, दक्षिण कोरिया, सेनेगल, इटली, स्पेन आणि व्हियेतनाम या देशांचा समावेश आहे. विशेष म्हणजे एकेकाळी जगात अग्रस्थानी असल्याने बदनाम झालेल्या इटलीचाही कौतुकाच्या यादीत समावेश आहे. पाकिस्तानात सध्या ६ हजार ४६ रुग्णांवर उपचार चालू आहेत. एकूण २ लाख ८८ हजार ५३६ रुग्णांनी करोनावर मात केली आहे, तर ६ हजार ३७३ रुग्णांचा या ससाथीत मृत्यू झालेला आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here