ब्रेकिंग : मुख्यमंत्र्यांना धमकी देणारा जेरबंद; ATS ने केली अटक

मुंबई :

अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहीम याचा हस्तक असलायचे भासवून मातोश्री हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान उडवून देण्याची धमकी देणाऱ्या एकाला दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) कोलकात्यातून अटक केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि शिवसेना नेते संजय राऊत यांना धमकीचे फोन त्या एकट्यानेच केली असल्याचा संशय आहे. पोलीस या प्रकरणाचा आणखी तपास करीत आहेत. कंगनाची बाजू घेऊन या नेत्यांना त्याने धमकावले होते. त्यामुळे पोलीस आता याचे सर्व धागेदोरे तपासून पाहणार आहेत.

शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील मार्केट, पॉलिटिकल & इकॉनॉमिक अपडेट्ससाठी पेज लाईक करून 'सी फर्स्ट' म्हणा..

Posted by कृषीरंग on Monday, September 7, 2020

दुबईहून दाऊद इब्राहिमचा हस्तक बोलत असल्याचा दावा करणारा फोन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी आल्यावर सुरक्षा वाढवण्यात आली होती. तसेच खासदार संजय राऊत यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी एकाला कलकत्ता येथे अटक केली आहे. शरद पवार यांनाही भारताबाहेरुन तर, कंगनाविषयी टिप्पणी केल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही 9 ते 10 वेळा धमकीचे फोन आले होते. त्यानुसार पोलिसांनी त्याला जेरबंद केले आहे.

आरोपी हा कोलकात्यातील टोलीगंज भागात राहणारा जिम प्रशिक्षक असल्याची माहिती आहे. आपल्या अशिलाला अडकवण्यासाठी त्याचा आयपी अ‍ॅड्रेस हॅक करुन व्हीओआयपी (VoIP) कॉल करण्यात आला असल्याचा दावा आरोपीच्या वकिलाने कोर्टात केला. मात्र, याचा जमीन अर्ज फेटाळून मुंबई पोलिसांसाठी आरोपीची चार दिवसांची कोठडी मिळाली आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here