डाळिंब बाजारभाव : ग्रेड १ ला मिळतोय दमदार भाव; तर डागी मालामुळे उत्पादक चिंतेत

पुणे :

सध्या महाराष्ट्रभरात डाळिंब या फळाला बऱ्यापैकी भाव मिळत आहे. ग्रेड १ क्वालिटीच्या डाळिंब फळाला सरासरी ८० ते ९० रुपये किलो असा भाव मिळत आहे. मात्र, त्याचवेळी यंदा जास्त पौ झाल्याने बहुसंख्य भागातील शेतकऱ्यांचा माल खराब झाल्याने अशा मालाला मात्र तुलनेने खूप कमी भाव मिळत आहे.

जास्त पावसामुळे डाळिंब फळाची चकाकी अनेक ठिकाणी खराब झालेली आहे. खर्डा माल जास्त असल्याने अशा शेतकऱ्यांना यंदाही मोठा नफा मिळालेला नाही. एकूणच सारासार विचार केल्यास यंदाही उत्पादक शेतकऱ्यांना या फळाने खास साथ दिलेली नाही. प्रक्रिया करण्याच्या कंपन्या आणि सोय खूप कमी असल्याने आहे त्याच भावात सध्या हे फळ विकण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्यायही नाही.

डाळिंब फळाचे रुपये प्रतिक्विंटल यामधील भाव असे :

दि. १२/०९/२०२०

बाजार समितीआवककिमानकमालसरासरी
अमरावती274300050004000
पुणे – मांजरी1300040003500
औरंगाबाद135120048003000
मुंबई889750085008000
जुन्नर – आळेफाटा3115000165009000
कोपरगाव2661000200008000
सोलापूर137550085002400
नाशिक187930092506500

दि. ११/०९/२०२०

पुणे – मांजरी2200040003000
मुंबई987700080007500
श्रीरामपूर10100025001750
पंढरपूर868140096004200
जुन्नर – आळेफाटा4185000155009000
नागपूर1255200060005000
संगमनेर230100075004250
मंगळवेढा766200101003800
राहता482865001500010000
सोलापूर1388500130003200
कोपरगाव26920002000010000
नाशिक1869300100007000

संपादन : माधुरी सचिन चोभे

शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील मार्केट, पॉलिटिकल & इकॉनॉमिक अपडेट्ससाठी पेज लाईक करून 'सी फर्स्ट' म्हणा..

Posted by कृषीरंग on Monday, September 7, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here