ब्रेकिंग : करोना रुग्णांना द्यावे लागणार इतके बील; पहा बिलाचे प्रकार व रक्कम

इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्याशी चर्चा करून आता करोना रुग्णांना उपचार देण्याचे नवे दरपत्रक तयार करण्यात आलेले आहे. तीन टप्प्यावरील रुग्णांसाठी स्वतंत्र पद्धतीने दरपत्रक ठरवण्यात आलेले आहे.

ज्यांना करोना विषाणूची लागण झालेली आहे मात्र, विशेष काहीही लक्षणे दिसत नाहीत अशा रुग्णांना प्रतिदिन ८ हजार रुपये इतके जास्तीतजास्त बील आकारण्यात येणार आहे. लक्षणे दिसत आहेत आणि आयसीयूमध्ये ठेवण्याची गरज असलेल्या रुग्णांना १३ हजार आणि ऑक्सिजन देण्याची गरज असलेल्या अत्यवस्थ रुग्णांना १५ हजार रुपये प्रतिदिन असे बिल आकारणी करण्यात येईल.

वरील बिलामध्ये हृदयरोग आणि मधुमेहाच्या रुग्णांनाही उपचार दिले जातील. मात्र, ठरवून दिलेल्यानुसार जेवण, काही चाचण्या, औषध आणि नर्सिंग शुल्क याच्या व्यतिरिक्त इतर काहीही चाचण्या किंवा रेमेडेसिव्हर आणि टोकलिझ्यूबम अशी इंजेक्शन देण्याची गरज पडल्यास रुग्णांना अतिरिक्त शुल्क मोजावे लागणार आहे. लोकमत.कॉम यांनी ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here