बारभाई कारस्थान पुस्तकात देणार फडणवीसांच्या कारनाम्यांची माहिती : खडसे

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरीधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. बारभाई कारस्थान पुस्तकात फडणवीसांच्या कारनाम्यांची माहिती देणार असल्याचे खडसे यांनी म्हटले आहे.

एबीपी माझा यांच्या कट्ट्यावर बोलताना ते म्हणाले की, पेशवेकाळात नानासाहेब फडणवीसांच्या काळात बारभाई मंडळ आणि त्यांची कारस्थानं होती. त्यावेळी धरावेच्या ऐवजी मारावे असे केले होते. तसेच माझ्याबाबत घडले आहे. फडणवीसांचं बारभाई कारस्थान हे पुस्तक लिहायला सगळी कागदपत्रं गोळा करत आहे. माहितीच्या अधिकारात मागवलेली कागदपत्रे यायला दोन-तीन महिन्यांचा कालावधी लागेल. मग पुस्तक लिहिले जाईल. या वस्तुनिष्ठ पुस्तकाचे प्रकाशन पुढील पाच-सात महिन्यात होईल.

माझा कट्टा कार्यक्रमात बोलताना खडसे यांनी अनेक गौप्यस्फोट केले. ते म्हणाले की, माझ्याकडे काही लोकांच्या व्हिडीओ क्लिप्स, कागदपत्रे आहेत. ती समोर आली तर हादरा बसेल. मात्र, खालच्या पातळीचं राजकारण करत नसल्याने मी वरिष्ठांना ते दाखवले आहे. त्यांच्यासारख्या चुका मी केल्या नाहीत. असे म्हून त्यांनी फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here