म्हणून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा; पासवान यांनी केली मागणी

महाराष्ट्रात उत्तर भारतीयांना टार्गेट केले जाते. अभिनेत्री कंगना यांनी प्रश्न विचारले म्हणून कार्यालय तोडण्यात आले. फक्त व्यंगचित्र फॉरवर्ड केल्याने माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली. असेच जर महाराष्ट्रात असेल तर तिथे तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करण्याची आवश्यकता असल्याचे  लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी म्हटले आहे.

पासवान यांनी म्हटले आहे की, लोकांमध्ये सुरक्षेची भावना नसेल, लोकांमध्ये भीतीचे वातावरण असेल आणि सरकारला लोक घाबरतील तर राष्ट्रपती राजवटीशिवाय पर्याय नाही. पासवान यांच्या बातमीवर बुद्धभूषण निकम यांनी म्हटले आहे की, काल परवा हरयाणा मध्ये गरीब शेतकरी वर लाठीचार्ज करण्यात आला तेव्हा कोणी बोलत नाही फक्त महाराष्ट्र मध्ये काही झालं तर तोंड पुढे करता आणि तुझा बिहार मधल्या गुन्हेगारी चा तर जगात एक अव्वल आहे.

तर, ऋषिकेश इंगळे यांनी म्हटले आहे की, मारहाण झालीय तर तीच कलमे लागतील? का भाजपा म्हणेल ती कलम लावावीत पोलीसांनी… अन ते निव्रुत्त अधीकारी असले म्हणुन काय झाले.. अश्लाघ्य अश्लील पोस्ट फिरवायची त्यांना मुभा आहे का? उद्या मोदींवर अस पसरवणार्याला पण पाठीशी घालणार का? अन कोर्टाने जामिन दिलाय, पोलीसांनी नाही!

सचिन आंबेकर यांनी म्हटले आहे की, अरे हेच लक्ष आपल्या राज्यात दे म्हणजे तिकडची जनता मुंबई येणार नाही नोकरी शोधात तुम्ही काम केली असतीत तर यूपी बिहारची जनता मुंबई नसती आली आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून सोडा आता लोकांची काम करा.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here