अभिनेते प्रकाश राज यांनी कंगनाला हाणला टोला; पहा कोणती इमेज पोस्ट केली त्यांनी

सध्या देशभरात एकाच विषयावर चर्चा चालू आहे. तो विषय म्हणजे कंगना राणावत. अभिनेत्री असूनही राजकीयदृष्ट्या महत्वाची ओळख पक्की करण्यात कंगना यांनी यश मिळवले आहे. त्यांनी स्वत:ला झाशीची राणी हे बिरूद चिटकवून घेतले आहे.

तोच धागा पडकून सुप्रसिद्ध अभिनेते आणि विचारी अभिनेता म्हणून ओळख असलेल्या प्रकाश राज यांनी कंगना यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी जस्ट अस्किंग असे म्हून एक इमेज शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, जर एका चित्रपटात भूमिका करून जर कंगना झाशीची राणी यांची जागा घेतल्याचे म्हणत असतील तर, मग इतरांनी केलेल्या अभिनायानुसार त्यांनाही तसेच म्हणायला पाहिजे की..!

त्यात त्यांनी दीपिका पदुकोन यांना पद्मावती, हृतिक रोषण यांना अकबर, शाहरुख खाण यांना सम्राट अशोक, अजयन देवगण यांना भगतसिंग, अमीर खाण यांना मंगल पांडे आणि विवेक ओबेराय यांना नरेंद्र मोदीजी म्हणायला मग काय हरकत आहे असाच टोला लगावला आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here