मराठवाडा विद्यापीठाच्या तारखा मंत्र्यांनी केल्या जाहीर; पहा काय केलेय तनपुरे यांनी ट्विट

औरंगाबाद :

परीक्षा होणार की नाही याचा गोंधळ पूर्णपणे मिटला आहे. आता त्या कधी, कशा आणि कुठे होणार हाच मुद्दा बाकी राहिला आहे. त्याबाबतची माहिती देताना उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी ट्विटरवर माहिती दिली आहे

त्यांनी म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंशी चर्चा केली. 15 तारखेपासून विद्यार्थ्यांचे online registration चालू होईल. साधारण 17 तारखेपासून विद्यार्थ्यांना mock tests उपलब्ध करून दिल्या जातील.

त्यांनी पुढे इतर माहिती देताना म्हटले आहे की, वेळ कमी असल्यामुळे व विद्यार्थ्यांना अनुभव नसल्याने Online परीक्षा खूप किचकट पद्धतीने ( कॅमेऱ्याद्वारे हालचालीवर नियंत्रण वगैरे) घेऊ नयेत अशी सुचना मी केली आहे. विद्यापीठात सुमारे 1000 दिव्यांग विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्यासाठी खास स्वयंसेवक नेमण्यात येतील. काळ कठीण आहे. परीक्षा कोणत्या पद्धतीने घ्याव्यात हे राज्य सरकारच्या हातात नाहीये. पण ही सर्व प्रक्रिया कशी सुरळीत पार पडेल यासाठी तुमच्या सोबत सदैव आहे. टेन्शन घेऊ नका. अभ्यास करा. सतत मी या प्रक्रियेचा आढावा घेत राहणार आहे. Best of luck !

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here