परीक्षेचे टेन्शन नका घेऊ; पहा मंत्र्यांनी काय दिलीय ट्विटरवर माहिती

मुंबई :

करोना कालावधीत परीक्षा न घेण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेला अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने खोडा बसला आहे. आता परीक्षा होणार हे निश्चित झालेले आहे. फ़क़्त कशा, कधी आणि कुठे होणार हाच प्रश्न बाकी आहे. त्यावर उच्च शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी ट्विटरवर माहिती दिली आहे.

तनपुरे यांनी म्हटले आहे की, काळ कठीण आहे. परीक्षा कोणत्या पद्धतीने घ्याव्यात हे राज्य सरकारच्या हातात नाहीये. पण ही सर्व प्रक्रिया कशी सुरळीत पार पडेल यासाठी तुमच्या सोबत सदैव आहे. टेन्शन घेऊ नका. अभ्यास करा. सतत मी या प्रक्रियेचा आढावा घेत राहणार आहे. Best of luck ! वेळ कमी असल्यामुळे व विद्यार्थ्यांना अनुभव नसल्याने Online परीक्षा खूप किचकट पद्धतीने ( कॅमेऱ्याद्वारे हालचालीवर नियंत्रण वगैरे) घेऊ नयेत अशी सुचना मी केली आहे. विद्यापीठात सुमारे 1000 दिव्यांग विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्यासाठी खास स्वयंसेवक नेमण्यात येतील.

पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंशी चर्चा केल्यानुसार तनपुरे यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंशी चर्चा केली. परीक्षा घेण्याची पद्धत सोपी व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना घरीच शक्य होईल अशी असावी अशी सुचना केली. मुख्य परीक्षेच्या आधी कमीत कमी 2-3 सराव परीक्षा होतील असे कुलगुरूंनी स्पष्ट केले. जर विद्यार्थ्यांना 40 प्रश्न सोडवायचे असतील, तर त्यानां 50 प्रश्न दिले जातील, आणि त्यातले 40 सोडवावे लागतील. विद्यार्थ्यांसमोरच्या अडचणी पाहता आणि नवीन परीक्षा पद्धत पाहता, प्रश्नांची difficulty level शक्यतो सोपी असावी. परीक्षा कोणत्या पद्धतीने घ्यावी हे राज्य सरकारच्या हातात नाही. परंतु ही प्रक्रिया साधी, सोपी असावी आणि सुरळीत पार पडावी या करता मी तुमच्या पाठीशी असणार आहे. टेन्शन घेऊ नका. अभ्यास करा. Best of luck ! इतर विद्यापीठांच्या कुलगुरूंशी देखील बोलणार आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here