म्हणून नक्कीच कोरफड वापरा; मिळवा ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

कोरफड ही अनेक समस्यांवर गुणकारी तसेच आरोग्यदायी आहे. चेहऱ्याच्या तर अनेक समस्यांवर कोरफड मोठ्या प्रमाणात उपायकारक आहे. महागडे फेसपॅक किंवा विविध दिखाऊ क्रीम वापरण्यापेक्षा कोरफड वापरलेली कधीही उत्तम आहे.

कारण कोरफडमध्ये कॅल्शियम, जस्त, तांबे, पोटॅशियम, लोह, सोडियम, मॅग्नेशियम, क्रोमियम आणि मॅंगनीज मुबलक प्रमाणात आढळतात. तसेच व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 12, बी 6, बी 2, बी 1, व्हिटॅमिन ए, बी 1, बी 2, बी 6, नियासिन आणि फोलिक ऍसिड देखील समाविष्ट आहेत.

तुमची त्वचा जर तेलकट असेल तर कोरफड जेलमध्ये लिंबाचे काही थेंब घाळून एकत्र करा आणि झोपण्यापूर्वी हे मिश्रण चेहऱ्यावर आणि गळ्यावर लावा. सकाळी उठल्यावर चेहरा आणि गळा शुवून घ्या. परिणामी तुम्हाला चमकणारी त्वचा मिळेल.

आपली त्वचा जर कोरडी वाटत असेल तर कोरफड जेल किंवा कोल्ड प्रेस केलेल्या व्हर्जिन नारळ तेलात काही थेंब तेल घालून मिश्रण करा आणि त्याचा वापर करा. काही दिवसात आपल्याला नक्कीच फरक जाणवेल.

संपादन : संचिता सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here