म्हणून खायची असते जेवनानंतर बडीशेप; ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात जेवणानंतर बडीशेप खाल्ली जाते. काही ठराविक अन्नपदार्थांमध्येही सुगंधी बडीशेप वापरली जाते. काही लोक थोडीशी कडवट बडीशेप खाण्यास प्राधान्य देतात तर काही जणांना सुगंधी आणि गोड बडीशेप आवडते.

जाणून घ्या जेवनानंतर बडीशेप खाण्याचे आरोग्यदायी फायदे :

  • बडीशेपमध्ये फायबर, फॉस्फरस, सेलेनियम, झिंक, मँगनिझ, कोलाईन, बीटा कॅरोटीन असे अँटी-ऑक्सिडंटस् मोठ्या प्रमाणावर असतात जे आपले ‘फ्री रॅडीकल्स’ पासून रक्षण करतात.
  • जेवनानंतर बडीशेप खाल्ल्यास पोटाच्या आजाराशी निगडीत तक्रारी दूर होतात. तसेच पचनक्रिया व्यवस्थित होते.
  • बडीशेपमधील पोटॅशिअम रक्तवाहिन्यांना लवचिक बनवतं. ज्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं.
  • जेवणानंतर एक चमचा बडीशेप आणि खडीसाखर सेवन केल्यास स्मरणशक्ती वाढते. (फक्त एकत्र खाण्यात सातत्य हवे)
  • बडीशेप खाण्याने तोंडाला येणारी दुर्गंधी कमी होते.
  • वजन कमी करण्यासाठी कपभर पाण्यात एक चमचाभर बडीशेप घालून उकळून घ्या आणि हे पाणी दिवसातून दोन ते तीन वेळा प्या. यामुळे वजन कमी होण्यासही मदत होईल.
  • खोकला येत असेल तर बडीशेप मधात मिक्स करून दिवसातून दोन ते तीन वेळा चावून खाल्ल्यास खोकला कमी होण्यास मदत होईल.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here