धक्कादायक खुलासा : पहा करोना नेमका कुठून आलाय आणि पसरलाय; संशोधकाने सांगितली स्टोरी

करोना म्हणावे किंवा कोरोना म्हणावे यावरून जसे जगभरात भांडण चालू आहे तसेच हा विषाणू नेमका मानवनिर्मित आहे की निसर्गात अगोदरच होता आणि चीनने तो जाणीवपूर्वक पसरवला की काहीतरी अपघाताने पसरला, यावरूनही अनेक मतमतांतरे आहेत. त्यातच आता चीनमधून पळून अमेरिकेत आश्रयाला आलेल्या एका संशोधक महिलेने धक्कादायक खुलासा केला आहे.

वूहान येथील विषाणू संशोधन प्रयोगशाळेत मुख्य संशोधक असलेल्या वायरॉलजिस्ट डॉ. ली-मेंग यान या चीनमधून अमेरिकेत पळून आल्याचा दावा करीत आहेत. त्यांनी Loose Women यांना दिलेल्या मुलाखतीत दावा केला आहे की, त्या वूहान येथील प्रयोगशाळेत काम करीत असल्याचे सांगतानाच त्यांनी म्हटले आहे की, सध्या माझ्या बाबतीत असलेला सर्व डाटा आणि माहिती चीनी सरकारने डिलीट केली आहे. त्यामुळे तिकडे माझे काहीही नामोनिशाण उरलेले नाही.

त्या सांगतात की मी ते सगळे पहावले नसल्याने अमेरिकेत पळून येऊन हे सांगत आहे. त्यांनी म्हटले आहे की, वूहन येथील प्रयोगशाळेत हा विषाणू बनवण्यात आलेला आहे. हा नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहे. SARS  विषाणूवर काम करताना जीनोम सीक्वेंस हा मानवी फिंगर प्रिंटसारखाच असतो. त्याच्या आधाराने हे सहजपणे सिद्ध करणेही शक्य आहे की हा विषाणू मानवाने बनवला आहे.

एकूणच आतापर्यंत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा चीनी विषाणू असल्याचे म्हटलेले आहे. अनेक बातम्या आणि अहवालाच्या हवाल्याने हा विषाणू मानवाने तयार केला आणि वूहान येथूनच त्या प्रयोगशाळेतून जगभर पसरला असे म्हटले आहे. चीनने हे सगळे दावे फेटाळले आहेत. त्यात आता वायरॉलजिस्ट डॉ. ली-मेंग यान हा नवा दावा करतानाच पुरावे देण्याचीही घोषणा करून टाकल्याने जगाचे लक्ष या बातमीकडे लागले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील मार्केट, पॉलिटिकल & इकॉनॉमिक अपडेट्ससाठी पेज लाईक करून 'सी फर्स्ट' म्हणा..

Posted by कृषीरंग on Monday, September 7, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here