रोहित पवारांनी ‘त्या’ शेतकऱ्याला केले आश्वस्त; बुलडाण्यातही काम करण्याचे दिले आश्वासन

पुणे :

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू असलेल्या रोहित पवार यांच्याकडून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षा आहेत. अनेकजण त्यासाठी त्यांना मागण्या, सूचना आणि मार्गदर्शन करीत असतात. तेही याची सकारात्मक पद्धतीने दखल घेतात. आताही त्यांनी बुलडाण्यातील एका शेतकऱ्याला आश्वस्त केले आहे.

शेतकरी अनिरुद्ध धोटे यांनी रोहित पवार यांना ट्विटरवर म्हटले होते की, दादा आपल्या एग्रीकल्चर डेवलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यात पण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. जेणेकरून आमच्या येथे पण शेतकरी शेती अजुन चांगल्या पध्दतीने शेती करेल. धोटे यांनी आपली मनातील भावना आशेताकारी हिताची गरज ट्विटर पोस्टद्वारे मांडली होती.

रोहित पवार यांनीही त्याला उत्तर देताना म्हटले आहे की, याबाबत नक्की काहीतरी करूया. पुढील महिन्यात भेटून यावर चर्चा करू. तिथल्या स्थानिक सामाजिक संस्थांना सोबत घेऊन काय करता येईल, याचा विचार करू.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here