ब्रेकिंग : राणेंनी शिवसेना आणि मंत्री आदित्यांवर केला ‘हा’ गंभीर आरोप; पहा काय म्हटलेय त्यांनी

मुंबई :

अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने नाराकॉटिक कंट्रोल ब्युरो यांना दिलेल्या माहितीमध्ये २५ बड्या सेलिब्रिटी व हस्तींची नवे दिल्याचे म्हटले जात आहे. तोच धागा पकडून भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरवर शिवसेना आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

त्यांनी म्हटले आहे की, रिया चक्रवर्तीने बॉलिवूड ड्रग माफिया मधली काही नावं जबाबात दिली आहेत. त्यामध्ये रेनड्रॉप मीडिया फाउंडर रोहिणी आयर यांचा उल्लेख आहे आणि हीच रेनड्रॉप कंपनी शिवसेनेने PRसाठी appoint केली आहे. पेंग्विनच्या माध्यमातून हे काम या कंपनीला मिळालं असं समजते. बाकी समजायला तुम्ही हुशार आहात.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here