मराठा समाजाला मुख्यमंत्र्यांनी या शब्दात केले आश्वस्त; पहा काय म्हटलेय ठाकरेंनी

मुंबई :

मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे समाजामधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. तर, भाजपने यावरून महाविकास आघाडीला खिंडीत पकडले आहे. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आश्वस्त करणारे आणि ठोस काहीतरी मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे.

त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही. हा लढा आपल्या सर्वांचा आहे. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जे जे काही करता येईल ते सर्व करू. यासंदर्भात आम्ही सर्व संबंधितांनाही विश्वासात घेऊन, त्यांच्या सूचनांचा विचार करणार आहोत.

शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील मार्केट, पॉलिटिकल & इकॉनॉमिक अपडेट्ससाठी पेज लाईक करून 'सी फर्स्ट' म्हणा..

Posted by कृषीरंग on Monday, September 7, 2020

तसेच विरोधी पक्षनेत्यांशी देखील या विषयावर सविस्तर बोलण्यात येईल. सरकार या प्रश्नी सुरुवातीपासून प्रामाणिक आहे आणि तळमळीने हा प्रश्न सोडवू इच्छिते पण राजकारणासाठी मराठा समाजाला भडकविण्याचे आणि आगी लावण्याचे काम आपण सहन करता कामा नये, असेही ठाकरेंनी म्हटले आहे.

त्यावर अभय शेरकर पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, महाविकास आघाडीचे नेते शरद पवारांनी स्वत:चं राजकीय,प्रशासकीय कसब पणाला लावुन मराठा विद्यार्थ्यांच होणारं शैक्षणिक नुकसान थांबवाव व समाजाला न्याय मिळवुन द्यावा… शरद पवार काहीही करु शकतात हे आजवर ऐकत आलोय,आता प्रात्यक्षिक करुन दाखवावे

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here