राणेंनी पवारांवर ‘त्या’ मुद्द्यांवरून केली टीका; फडणवीसांची केलीय पाठराखण

मुंबई :

कॅगच्या अहवालानुसार महाराष्ट्र राज्यात ५ वर्षे मोठ्या वाजत-गाजत राबवलेली जलयुक्त शिवार योजना तितकीशी फायदेशीर झालेली नाही. उलट त्यात कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाला की काय अशीच शंका येण्याजोगी परिस्थिती आहे. त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस नेत्यांनी आवाज उठवून तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेला सुरुवात केली आहे.

शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील मार्केट, पॉलिटिकल & इकॉनॉमिक अपडेट्ससाठी पेज लाईक करून 'सी फर्स्ट' म्हणा..

Posted by कृषीरंग on Monday, September 7, 2020

आपले नेते फडणवीस यांच्यावर टीका झाल्याने व्यथित झालेल्या माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विटरवर पुन्हा एकदा शरद पवारांना लक्ष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, काही लोकं CAG चा हवाला देऊन जलयुक्त शिवार वर टीका करतायत पण त्यांच्याचं कुटुंबावर Irrigation scam, Lavasa Scam आणि 2Gscam या विषयांवर CAG ने काय लिहिलंय हे पण एकदा वाचून घ्यावं. तिकडचे शेतकरी सहनशील आहेत म्हणून लवासामध्ये कोणी टोपी घातली हे माहिती असून सुद्धा ते बिचारे गप्प आहेत.

आता यावर आमदार रोहित पवार कोणते उत्तर देतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. त्याचवेळी कुमार चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, जलयुक्त शिवाराची 22589 गावांमध्ये कामं झाली पैकी CAG ने फक्त 120 गावांमध्ये पहाणी केली. निदान इतर गावांमध्ये प्रत्यक्षात नसेलं जमलं तर आढावा अहवाल तरी CAG ने मागवून घ्यायला हवा होता. केवळ १२० गावांच्या पहाणीवर संपुर्ण योजनेचे मूल्यमापन करणं हे वस्तुस्थितीला धरून नाही.

तर, सुनील पाटील यांनी प्रतिक्रिया लिहिली आहे की, हे म्हणजे स्वतः चे ठेवायचे झाकुन दुसऱ्याचे बधाई बघायचे वाकुन एकुण सगळे राजकारणी सारखेच फक्त प्रकरण भ्रष्टाचार बाहेर येतात कारवाई मात्र शुन्य जनतेला दर पाच वर्षांत उल्लु बनवले जाते.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here