हा प्रकार नॉर्मल, सगळे योग्य होईल; ऑक्सफर्डच्या लसबाबत WHO म्हणतेय की

ब्रिटनमधील एका लस दिलेल्या रुग्णाच्या पाठीच्या हाड्कामध्ये मणक्याच्या बाजूला सूज आल्याचे लक्षण दिसल्यावर तातडीने लसच्या ट्रायल रोखण्यात आलेल्या आहेत. जगभरातील ६० देशांमधील अशा पद्धतीच्या क्लिनिकल ट्रायल थांबल्याने अनेकांची चिंता वाढली आहे. त्यावर WHO च्या चीफ साइंटिस्ट डॉ. सौम्या विश्वनाथन यांनी हे नॉर्मल असून सगळे योग्य होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

यापूर्वीही अशा पद्धतीने प्रत्येक संशोधनात आणि त्यांच्या क्लिनिकल ट्रायलमध्ये अनेकदा अडचणी आलेल्या आहेत. आता सर्व जगाचे लक्ष लस या विषयावर असल्याने त्याकडे अवघ्या जगाचे लक्ष गेलेले आहे. संबंधित रुग्णाची तब्बेत स्थिर असून लवकरच पुन्हा एकदा तिसऱ्या टप्प्यातील लसच्या ट्रायल सुरू होतील. तसेच लाखो लोकांना दिलेल्या या लसच्या आकडेवारीचे विश्लेषण करून मगच यावरील निर्णय जाहीर केला जाईल.

AstraZeneca कंपनीचे CEO पास्कल सॉरियट यांनीही म्हटले आहे की, तिसऱ्या टप्प्यावर ५० हजार व्यक्तींवर ट्रायल घेतली जात आहे. आतापर्यंत खूप चांगले रिझल्ट येत होते. अशा किरकोळ अडचणी संशोधनात येतच असतात. सगळेजण मिळून यातून नक्कीच मार्ग निघेल. पुढील वर्षी ही लस नक्की जगभरातील रुग्णांच्या सेवेसाठी हजार होईल असाच विश्वास वाटतो. सध्या संबंधित रुग्णाची तब्बेत स्थिर असून त्याच्यावर उपचार चालू आहेत. त्याचे नेमके कारण शोधण्याचे कामही डॉक्टर व संशोधकांची टीम करीत आहे.

संपादन : सचिन पाटील

शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील मार्केट, पॉलिटिकल & इकॉनॉमिक अपडेट्ससाठी पेज लाईक करून 'सी फर्स्ट' म्हणा..

Posted by कृषीरंग on Monday, September 7, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here