श्रीगोंद्यात रु. ३००० तर, आळेफाटा येथे कांद्याला रु. ३२१० / क्विंटल भाव; पहा आजचे महाराष्ट्रातील बाजारभाव

पुणे :

पावसाने मोठ्या प्रमाणावर कांदा खराब झाल्याने आहे त्या कांद्याला बाजारात वाढीव भाव मिळत आहे. कांद्याच्या भावात पुन्हा एकदा चांगली तेजी आली असून केंद्र किंवा राज्य सरकारने हस्तक्षेप करण्याचे ‘कर्तव्य’ बजावले नाही तर उत्पादक शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आणखी भाववाढ होऊन अच्छे दिन येतील.

गुरुवारी (दि. १० सप्टेंबर २०२०) अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळे बाजार समितीमध्ये कांद्याला ३०१० रुपये क्विंटल असा भाव मिळाला. त्या बाजार समितीत काल झालेल्या लिलावात १००० ते ३००० रुपये भावासह सरासरी २८०० रुपये भाव मिळाला होता. तर, शुक्रवारी पुणे जिल्ह्यातील आळेफाटा येथे सर्वाधिक ३२१० रुपये इतका भाव मिळाला आहे.

शुक्रवारी (दि. ११ सप्टेंबर २०२०) महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समितीमधील बाजारभाव असे :

स्त्रोत : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे

बाजार समितीकिमानकमालसरासरी
कोल्हापूर१०००२५००१७००
मुंबई१४००२५००१९५०
आळेफाटा (जुन्नर)१८००३२१०२५००
पुणे७००२५००१६००
येवला३००२७००२२००
नाशिक७००३०००२४००
लासलगाव१०००२६००२२००
मुंगसे (मालेगाव)५००२७००२३५०
कळवण७००२७००२३५०
चांदवड११००२७००२३००
मनमाड५००२५६०२४००
सटाणा७००२७००२३२५
कोपरगाव१००२४८८२२५१
पिंपळगाव बसवंत७००३०००२२५१
देवळा८००२५०५२२५०
राहता५००२८००१९००
उमराणे९००२७००२४००
नामपूर५००३०००२३००

संपादन : माधुरी सचिन चोभे

शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील मार्केट, पॉलिटिकल & इकॉनॉमिक अपडेट्ससाठी पेज लाईक करून 'सी फर्स्ट' म्हणा..

Posted by कृषीरंग on Monday, September 7, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here