पवारसाहेब दिशाभूल करत आहेत; चंद्रकांत पाटलांनी मांडला ‘हा’ मुद्दा

मुंबई :

मराठा आरक्षणाच्या स्थगितीवर अध्यादेश काढणे हा मार्ग असू शकतो. कायदेशीर सल्लागारांनी हे संमत केले तर कोणी आंदोलन करण्याची भूमिका घेईल, असे मला वाटत नाही, असे म्हणत मराठा आरक्षणाबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. याच पार्श्वभूमीवर ‘पवार साहेब ग्रेट आहेत. सुप्रीम कोर्टात घटनापीठाकडे निर्णय जातो, मग अध्यादेश कसा काढायचा? लोकांनी आंदोलन करू नये, म्हणून त्यांना फसवलं जात आहे’, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

‘उगीच दिशाभूल करू नका. कायदा स्टे झाला, तर मग अध्यादेश कसा निघेल?’, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. यावेळी त्यांनी ‘आमचं सरकार असतं तर आरक्षण १०० टक्के टिकलं असतं’, असेही स्पष्ट केले.

राजकारणात येईपर्यंत मला ही माणसं मोठी वाटायची, पण आता लक्षात आलं की यांना काहीच कळत नाही, असा टोलाही पुढे बोलताना पाटलांनी हाणला. ‘आरक्षण मिळणार नसेल, तर आरक्षणाएवढ्याच सुविधा मराठा समजाला मिळायला हव्यात’, अशी आपली मतही त्यांनी पुढे बोलताना मांडले.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here